भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमधील वाद नेहमीच चर्चेचे विषय ठरतात. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांना सोशल मीडियावर एकमेकांशी वाद घालताना पाहिले आहे. यादरम्यान आता आफ्रिदीची आत्मकथा ‘गेम चेंजर’ पुन्हा चर्चेत आली आहे.
२०१९मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गेम चेंजर’ (Game Changer) या पुस्तकात आफ्रिदीने गंभीरवर (Gautam Gambhir) जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर त्याने गंभीरला गर्विष्ठदेखील म्हटले आहे.
आपल्या आत्मचरित्र पुस्तकात आफ्रिदीने लिहिले की, त्याला गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नविरुद्ध (Shane Warne) खेळायला जास्त आवडत होते. कारण ते दोघेही अपशब्द वापरल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर देत होते.
आफ्रिदीने (Shahid Afridi) या पुस्तकात गंभीरबद्दल लिहिले की, “काही वैयक्तिक वाद होते. तर काही व्यावसायिक. परंतु गंभीर एक वेगळेच प्रकरण होते. त्याच्या गर्विष्ठपणामुळे तो खूप वाईट होता.”
“गंभीरबरोबर गर्विष्ठपणाची समस्या होती. तो ज्याचे काही व्यक्तित्व नाही. कारण क्रिकेटसारख्या महान खेळात त्याच्यासारखे व्यक्तिमत्त्व कदाचित कोणाचेच नसेल. तो असा होता ज्याच्या नावावर कोणताही विक्रम नाही. फक्त खूप सारा गर्विष्ठपणा होता. त्याला असे वाटते की, तो डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बाँड या दिग्गजांसारखी क्षमता त्याच्याकडे आहे,” असेही त्याने आपल्या पुस्तकात लिहिले आहे.
आफ्रिदीने गंभीरच्या विक्रमांवर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु गंभीरने भारतासाठी २ विश्वचषकांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याने २००७च्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ७५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये भारताने विजय मिळविला होता. अशाच प्रकारे त्याने २०११मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ९७ धावांची खेळी केली होती. या विश्वचषकातही भारताने विजेतेपद पटकाविले होते.
गंभीरव्यतिरिक्त आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्र (AutoBiography) पुस्तकात भारताच्या त्या खेळाडूंवर आपले मत व्यक्त केले आहे, ज्यांच्याबरोबर तो खेळला आहे. आफ्रिदीने या पुस्तकात युवराज सिंग (Yuvraj Singh), हरभजन सिंग (Yuvraj Singh) आणि अजय जडेजाची (Ajay Jadeja) प्रशंसा करत त्यांंना आपला चांगला मित्र असल्याचे सांगितले आहे.
युवराज, हरभजन आणि जडेजाबद्दल त्याने आपल्या पुस्तकात लिहिले की, आम्ही खूप वेळ एकमेकांबरोबर घालवला आहे. परंतु मैदानावर आम्ही एकमेकांकडे पाहतही नव्हतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमधील त्या ३ तासांनी मॅक्क्युलम व आयपीएलचे बदलले जग
-मला त्याने सी ग्रेड कलाकार म्हटलं, त्यामुळे परत मैत्री झालीच नाही
-पाहता पाहता १२ वर्ष झाली, आयपीएल सुरु झाली होती याच दिवशी १२ वर्षांपुर्वी