आयपीएलचा १५ वा हंगाम(IPL 2022) मार्च महिन्यात खेळवला जाणार आहे. हंगामाच्या पूर्वी बँगलोरमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक मोठे खेळाडू विकले गेले नाहीत, तर अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या आणि ते कोट्यधीश झाले. लिलावाच्या पहिल्या दिवशी लिलाव सुरु होऊन अडीच तास झाल्यानंतर ऑक्शनर ह्युज एडमिड्स हे चक्कर येऊन खाली पडले. या घटनेमुळे लिलाव मध्ये थांबवावा लागला. प्राथमिक उपचारानंतर आयपीएल गवार्निंग काउन्सिलने त्यांना आराम करण्यास सांगितले व नविन ऑक्शनर म्हणून चारू शर्मा(Charu sharma) यांना बोलवले.
बँगलोरमध्येच उपस्थित असलेले चारू शर्मा यांना लिलावासाठी बोलवण्यात आले. एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी बोलताना त्यांनी सांगितले की, “त्यांना आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, लवकर तयार व्हा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचा. येथे आणीबाणी आहे.”
पूढे चारु यांनी सांगितले की, तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही माहिती नव्हती. पण ते लगेचच आयटीसी गार्डेनिया हॉटेलकडे निघून गेले. त्याच हॉटेलजवळ त्यांचे घर होते, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये न अडकता ते तिकडे सहजच पोहचू शकले. ब्रिजेश पटेल यांचा फोन चारू शर्मा यांना आला, तेव्हा त्यांच्या घरी पाहुणे आले होते आणि त्यांनी लिलावाबद्दल टिव्हीवर काही पहिले सुद्धा नव्हते, त्यामुळे ते अगोदर घाबरले होते.
ते म्हणाले की “ब्रिजेश पटेल हा माझा जुना मित्र आहे. म्हणून जेव्हा त्याचा कॉल आला तेव्हा मला जावे लागले आणि एक व्यावसायिक म्हणून मी यापूर्वी लिलाव केले आहेत आणि येथे सर्व काही आधीच तयार होते, त्यामुळे फारसा त्रास झाला नाही.”
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर चारू शर्मा यांना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर त्यांनी लिलावाची तयारी सुरू केली. चारू शर्मा म्हणाले की, “मी १५ मिनिटांत सगळी चौकशी केली, काय झाले आणि पुढे काय करायचे आहे. त्यानंतर मी लिलाव सुरू केला.”
चारू शर्मा हे नाव ९० च्या दशकात किंवा त्या अगोदरच्या क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन नाव नव्हते, परंतु ते लिलाव कश्या पद्धतीने आयोजित करतील यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. अनुभव असलेल्या चारू शर्मांनी अवघ्या एक तासात तयारी करत मेगा लिलाव व्यवस्थित पुढे नेला आणि शेवटी सर्व संघांकडून स्वतःसाठी टाळ्या सुद्धा मिळवल्या.
हेही वाचा- ‘ह्युज एडमिड्स’ कोसळल्यावर ‘या’ व्यक्तीने लढवला आयपीएल लिलावाचा किल्ला, जाणून घ्या नव्या ऑक्शनरबद्दल
चारू शर्मा म्हणाले की हा त्यांच्यासाठी एक मजेशीर अनुभव होता. ते म्हणाले की, “माझ्यासाठी हा लिलाव हॅमरमध्ये अजुन एक दिवस होता, फक्त फरक एवढाच होता की यावेळी जास्त लोक पाहात होते. दोन रुपयांचा लिलाव होवो किंवा १ कोटींचा लिलाव होवो. सर्व समानच असते.”
चारू शर्मा यांनी या लिलावात भाग घेतल्यानंतर म्हटलं आहे की, “माझे आयुष्याच खेळावर आधारित आहे आणि खेळासाठी माझी सेवा उपयोगी पडली.” चारू यांनी ह्यूज एडमिड्स यांना सुद्धा लवकर बरे होण्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेमध्ये महाराष्ट्रीयन खेळाडूंची एकहाती सत्ता! ऋतुराजसह गायकवाडसह ‘हे’ ५ शिलेदार सामील
‘सीएसके फॅमिली’त अजून एका मराठमोळ्या खेळाडूची एन्ट्री, मुंबईच्या प्रशांत सोळंकीची ताफ्यात निवड
न्यूझीलंडच्या २ बहिणी टीम इंडियावर पडल्या भारी, ६२ धावांनी पहिली वनडे जिंकत मालिकेचा केला शुभारंभ