---Advertisement---

विराट कोहलीने केला खूलासा, मैदानाबाहेर बसून विलियम्सनबरोबर मारल्या या विषयावर गप्पा

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2020 11:37 AM
---Advertisement---

काही दिवसांपुर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील 2 फेब्रुवारीला झालेल्या शेवटच्या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हे मैदानात बाऊंड्री लाईनच्या बाहेर गप्पा मारत बसलेले दिसले होते.

भारतीय संघ बुधवारी (19 फेब्रुवारी) वेलिंंग्टन येथील भारतीय दुतावासाच्या भेटीला गेला असताना विराटने त्यांच्यात झालेल्या संभाषणाबद्दल सांगितले आहे. “गेल्या 3-4 वर्षात आम्ही खूप प्रगती केली आहे. आम्ही आता अशा पातळीवर पोहोचलो आहोत की प्रत्येक संघ आम्हाला पराभूत करू इच्छित आहे.”

“न्यूझीलंडचीही अशीच इच्छा असणार आहे. पण मला याच्याशी काही हरकत नाही आणि म्हणूनच मी सामन्यादरम्यान बाऊंड्री लाईनच्या बाहेर विलियम्सनशी गप्पा मारत बसलो होतो. यावेळी आम्ही क्रिकेटबद्दल चर्चा न करता आयुष्यातील दुसऱ्या विषयांवर बोलत होत.” असे विराट यावेळी म्हणाला.

कोहली विषयी आदर व्यक्त करत विलियम्सनने सांगितले की, “माझे आणि कोहलीचे विचार बऱ्याचपैकी सारखे आहेत. त्यामुळे भारताच्या कर्णधाराशी क्रिकेट व्यतिरिक्त अश्या वेगळ्या विषयावर चर्चा करून प्रसन्न वाटले.”

“खरोखरच मैदानाबाहेर बसून एकमेकांशी संवाद साधून, विचारांची देवाणघेवाण करून खूप मजा आली. क्रिकेटच्या बाबतीत आमचे विचार एकमेकांशी मिळतेजुळते आहेत. दोघांची खेळण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र, आपल्या स्पर्धात्मक वृत्तीने नेहमी पुढे जाण्याचा दृष्टीकोन असणाऱ्या कर्णधाराशी बोलणे प्रेरणादायी होते.” असेही तो पुढे म्हणाला.

याचबरोबर विराटसोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा देत विलियम्सन म्हणाला की, “मी आणि विराटने अनेक सामने एकमेंकाविरोधात खेळले आहेत. यात 19 वर्षांखालील विश्वचषक तसेच आयपीएल यांचा समावेश आहे. असे असतानाही विराटच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील कामगिरीमुळे मी अनेकवेळा त्याचे कौतुक करत असतो.”

कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZ Vs IND) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---