पॅरिसमध्ये सध्या ऑलिम्पिक 2024 ला सुरूवात झाली आहे. खेळांचा महाकुंभ म्हणजेच ऑलिम्पिकला शुक्रवार, 26 जुलै रोजी सुरू झाला. पॅरिस ऑलिम्पिकची जगभरात चर्चा होत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 28 जुलै रोजी ‘मन की बात’मध्ये पॅरिस ऑलिम्पिकबद्दल सांगितले. पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंना चिअर करण्याचे आवाहन केले. ऑलिम्पिकमुळे आपल्या खेळाडूंना जागतिक स्तरावर तिरंगा फडकवण्याची संधी कशी मिळते हे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी पॅरिस ऑलिम्पिकसोबतच ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली. मोदी म्हणाले, “सध्या पॅरिस ऑलिम्पिक जगभरात चर्चेत आहे. ऑलिम्पिकमुळे आपल्या खेळाडूंना जागतिक मंचावर तिरंगा ध्वज फडकवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते. तुम्हीही भारतासाठी तुमच्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे.”
ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ 26 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता, परंतु भारताने एक दिवस आधी म्हणजेच 25 जुलै, गुरुवारी या खेळांच्या महाकुंभमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात केली होती. भारताने या ऑलिम्पिकची सुरुवात तिरंदाजीने केली. आता दिवसेंदिवस वाढत असताना विविध खेळांसाठी खेळाडू मैदानात येत आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 117 भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतले आहेत. या खेळाडूंमध्ये 70 पुरुष आणि 47 महिलांचा समावेश आहे. यावेळी भारतीय खेळाडू मागील टोकियो ऑलिम्पिकचा विक्रम मोडतील अशी अपेक्षा आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण 7 पदके जिंकली होती, ज्यामध्ये 1 सुवर्णाचा समावेश होता. टोकियोमध्ये जिंकलेली 7 पदके ही भारतासाठी कोणत्याही ऑलिम्पिकमधील सर्वाधिक पदकांची संख्या होती. आता पॅरिसमध्ये यावेळी भारतीय खेळाडू किती पदके मिळवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा-
विश्वविजेत्या संघातील खेळाडूला हेड कोच गंभीरनं डावललं? पहिल्या सामन्यातच बसावं लागलं बाहेर
अवघ्या 29 मिनिटांत काम तमाम! पीव्ही सिंधूच्या ऑलिम्पिक मोहिमेला धडाक्यात सुरुवात
अफगाणिस्तान भारतात खेळणार कसोटी सामना, तारीख आणि मैदान ठरलं