---Advertisement---

‘विरुष्का’चं सरप्राईज! लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात भारतीय शेफला केलं चकीत

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 12:39 AM
---Advertisement---

लॉर्ड्स कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मिळालेल्या विश्रांतीचा वेळ आपल्या कुटुंबासमवेत घालवला आहे. त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबत निवांत वेळ घालवला. नुकतेच ते लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवले.

अनुष्का शर्मा लंडनच्या ‘टेंड्रिल किचन’ या रेस्टॉरंटचा आढावा वाचल्यानंतर इतकी प्रभावित झाली की तिने तिथे जाण्याचा विचार केला. विराट आणि अनुष्काला पाहून रेस्टॉरंटचे हेड शेफ रिशिम सचदेव याला खूप आश्चर्य वाटले आणि तो इतका आनंदी झाला की त्याला काहीच कळत नव्हते.

विराटने दोघांसाठी टेबल बुक केले
रिशिम सचदेवने विराट कोहली आणि अनुष्का शर्मासोबत एक अविस्मरणीय फोटो काढला. रिशिमने सांगितले की, विराटने त्याला फोन करताना दोघांसाठी टेबल बुक केले होते. या पॉवर कपलचे पाहुणचार करताना त्याला अभिमान वाटत होता.

विरुष्काला जेवण आवडले
रिशिमला भीती होती की, विराट आणि अनुष्का यांना रेस्टॉरंटचे जेवण आवडेल की नाही, पण त्यांनी ते आतापर्यंतचे सर्वोत्तम जेवण बनवल्याचे सांगितले.

हे भारतीय क्रिकेटपटू देखील पोहोचले
विराट रात्रीच्या जेवणाच्या वेळी देखील भारतीय  संघाच्या अनेक खेळाडूंसह ‘टेंड्रिल किचन’ मध्ये पोहोचला होता. ज्यात केएल राहुल, इशांत शर्मा, मयंक अगरवाल या खेळाडूंचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विन व त्याची पत्नी प्रीती नारायणन हे देखील जेवण करण्यासाठी येथे पोहोचले.

भारतीय संघ सध्या कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये एक कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारताने आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. नॉटिंघम कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. पण लॉर्ड्स कसोटीत भारताने अप्रतिम खेळ दाखवला आणि इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीचा भिडू परतला! आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई संघासाठी ‘हा’ खेळाडू असेल उपलब्ध

“बुमराहला कधीकधी डिवचले तर काही हरकत नाही”, माजी भारतीय क्रिकेटरचा इंग्लंड संघाला टोला

पुजारा किंवा रहाणे नव्हे तर, हेडिंग्ले कसोटीत ‘या’ खेळाडूला द्या संधी, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---