इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. तसेच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ यूएईला रवाना झाले आहेत. दरम्यान स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली होती. स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी हा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. तसेच दुसऱ्या टप्प्यात हा संघ आणखी बळकट होणार आहे.स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात जोश हेजलवूड देखील खेळताना दिसून येणार आहे.(Josh Hazlewood will available for 2nd phase of ipl 2021)
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याने बायो बबलला कंटाळून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर म्हटले होते की, “गेल्या १० महिन्यांपासून आम्ही बायो बबलचे पालन करत आहोत. त्यामुळे मी क्रिकेट मधून काही काळ विश्रांती घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये घरीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
आता सीएसके संघाचे विशेष कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी हेजलवूड स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याची खात्री पटवून दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले की, “हेजलवूड १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार आहे. तसेच बीसीसीआयने ही जाहीर केले आहे की,ज्या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळण्यास नकार दिला होता, ते फिट आणि खेळण्यास उपलब्ध असतील तर ते दुसऱ्या टप्प्यात खेळू शकतील. तो आमच्या संघासाठी एक महत्वाचा पर्याय ठरू शकतो.”
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी जोश हेजलवूडची ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेचा फायदा त्याला टी -२० विश्वचषक स्पर्धेत होऊ शकते. त्याने आतापर्यंत एकूण १७ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याला २१ गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“बुमराहला कधीकधी डिवचले तर काही हरकत नाही”, माजी भारतीय क्रिकेटरचा इंग्लंड संघाला टोला
पुजारा किंवा रहाणे नव्हे तर, हेडिंग्ले कसोटीत ‘या’ खेळाडूला द्या संधी, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
‘या’ कारणामुळे १० वर्षांपूर्वी आजचा दिवस महेंद्रसिंग धोनीसाठी ठरला होता काळा दिवस