यंदाच्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. त्यासाठी सर्व संघ तयारी करत आहे. दरम्यान क्रिकेटचे चाहते देखील या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसारख्या बलाढ्य संघांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण चेन्नई सुपर किंग्जच्या मोठ्या रेकाॅर्डबद्दल जाणून घेऊया. (CSK Records In IPL History)
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आपल्या दमदार कामगिरीने एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सर्वाधिक वेळा आयपीएलच्या फायनल सामन्यात पोहोचण्याचा रेकाॅर्ड चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. या ‘यलो आर्मी’ने आतापर्यंत तब्बल 10 वेळा फायनलमध्ये धडक मारली आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये चेन्नईने विजेतेपद पटकावले. (CSK Won IPL Trophy 5 Times) धोनीने आपल्या शांत आणि संयमी नेतृत्वाने संघाला नेहमीच योग्य दिशा दाखवली आहे. चेन्नई सुपर किंग्जने 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्याच हंगामात फायनलमध्ये प्रवेश केला. पण त्याना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दरम्यान त्यांच्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर 2012, 2013, 2015 आणि 2019 मध्येही चेन्नईने फायनलमध्ये प्रवेश केला.
चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल प्रवास-
2008- उपविजेता
2010- विजेता
2011- विजेता
2012- उपविजेता
2013- उपविजेता
2015- उपविजेता
2018- विजेता
2019- उपविजेता
2021- विजेता
2023- विजेता
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान 10 वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा रेकाॅर्ड त्यांच्या नावावर आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात देखील चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणेदेखील उत्सुकतेचं ठरेल. यंदा रूतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) संघाचे नेतृत्व करताना दिसेल. (23 मार्च) रोजी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सशी सामना खेळून चेन्नई आपल्या मोहिमेला सुरूवात करेल.
आयपीएल 2025 साठी चेन्नई सुपर किंग्ज- रुतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, शेख रशीद, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, रचिन रवींद्र, आर. अश्विन, दीपक हुडा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, सॅम करन
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अश्विनचा सर्वोत्तम संघ; कर्णधार तर सोडा, रोहित शर्मा राखीव म्हणूनही नाही!
चॅम्पियन्स ट्रॉफीचा बेस्ट प्लेयर? वसीम अक्रम यांनी कोहली-रोहितला नाही दिली पसंती!
ऋषभ पंतचा हटके अंदाज – बहिणीच्या हळदी-मेहंदी सोहळ्यात रंगतदार एंट्री