इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडू सहभागी होते. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली आहे. दरम्यान, या लिलावात सर्वात जास्त लक्षवेधक चेहरा होता, तो म्हणजे दीपक चाहर.
चाहरला विकत घेण्यासाठी बऱ्याच संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. तो या हंगामात २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी त्याला विकत घेण्यासाठी बोली लावल्या. त्यानंतर या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी घेतली.
🦁 LION ALERT – DEEback! ❤️🔥🔥⁰⁰#SuperAuction #WhistlePodu #Yellove 🦁💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 12, 2022
अखेर त्याची जुनी आयपीएल फ्रँचायझी चेन्नईने त्याला १४ कोटींची ऐतिहासिक बोली लावत विकत घेतले आहे. चेन्नईने आजवर कोणत्या गोलंदाजासाठी लावलेली ही सर्वात मोठी बोली आहे. विशेष म्हणजे, चेन्नईनेच २०१८ मध्ये दीपक चाहरला ८० लाखांना विकत घेतले होते. परंतु आता त्याची किंमत कोटींमध्ये गेली आहे.
.@deepak_chahar9 is SOLD to @ChennaiIPL for INR 14 crore 👌😎💰#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
दीपक चाहरने आयपीएल २०२१ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना प्रभावी प्रदर्शन केले होते. त्याने चेन्नईकडून १५ सामने खेळताना १४ विकेट्स घेतल्या होत्या आणि संघाला चौथे विजेतेपद जिंकण्यासाठी मोलाचा हातभार लावला होता. त्याच्या एकूण आयपीएल कामगिरीवर नजर टाकायची झाल्यास त्याने आतापर्यंत ६३ सामने खेळताना ५९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दीपक चाहरसाठी लिलावात झाली कांटे की टक्कर! अखेर चेन्नई संघाने ऐतिहासिक बोली लगावत घेतले संघात
इशान १५.२५ कोटींना जाऊनही आयपीएल इतिहासातील चौथा महागडा खेळाडू, मग पहिले तिघे कोण? वाचा
‘स्फोटक पूरन’ बनला हैदराबादचा मियॉं! तगड्या बोलीने रचला इतिहास