---Advertisement---

एमएस धोनीच्या शिफारशीमुळे ‘हा’ खेळाडू झाला मालामाल

On: बुधवार, जुलै 15, 2020 11:32 AM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी मागील वर्षी खेळाडूंचा लिलाव झाला. यात चेन्नई सुपर किंग्स संघाच्या एका निर्णयाने सारे जण हैराण झाले आहेत. चेन्नई संघाने पीयुष चावलाला सर्वाधिक 6 कोटी 75 लाख मी रुपये देऊन रक्कम देऊन आपल्या संघात सामील केले.

चावलास चेन्नईच्या संघात घेण्यासाठी एमएस धोनीने शिफारस केली, असल्याचा खुलासा स्वतः पीयुष चावला यांने ‘स्पोर्ट्स क्रीडा’ शी बोलताना केला. 

चेन्नईने त्याला संघात घेण्यापूर्वी पीयुषने आयपीएलमध्ये किंग्स इलेवन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे . 2014 साली कोलकाता नाइट रायडर्स संघाला आयपीएलची ट्रॉफी मिळवून देण्यात चावलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आयपीएलच्या 150 सामन्यात 27.15 च्या सरासरीने 157 गडी बाद केले आहेत.

पीयुष चावला चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबिरात दाखल झाल्यानंतर एमएस धोनीशी संवाद साधला. त्यावेळी धोनी त्याला म्हणाला, ”तुला संघात घेण्याचा निर्णय हा माझा होता.”

या वेळी पीयूष चावलाला धोनीच्या भविष्याविषयी देखील विचारले असता तो म्हणाला,” हा विषय चर्चे बाहेरचा आहे. मला माहित नाही तो खेळेल की नाही.”

मागील वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर एमएस धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आयपीएलमधून तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र या स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.

मार्च महिन्यात तो चेन्नईच्या सराव शिबिरात दाखल झाला होता. कोरोनामुळे शिबिर देखील थांबवण्यात आले. त्यामुळे धोनी पुन्हा घरी परतला. सध्या तो रांची येथील त्याच्या फार्म हाऊसवर आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून समाजसेवा करण्यात व्यस्त आहे या भारतीय क्रिकेटपटूची पत्नी

खुशखबर! इंग्लंडनंतर आता या देशात होणार क्रिकेटचे पुनरागमन

तब्बल ३५ मुलांच्या हृदयाच्या सर्जरीसाठी ‘या’ माजी दिग्गजाने घेतला पुढाकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---