---Advertisement---

IPL Mega Auction; दिग्गज फिरकीपटू खेळणार धोनीच्या संघातून, 9.75 कोटीला केले खरेदी

Ravichandran Ashwin
---Advertisement---

शेवटच्या आयपीएल हंगामात रविचंद्रन अश्विन राजस्थान राॅयल्स (RR) संघाचा भाग होता. पण आता मेगा लिलावात (IPL Mega Auction) चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) 2025च्या हंगामासाठी रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) खरेदी केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने रविचंद्रन अश्विनला 9.75 कोटी रुपयांना खरेदी केले. अश्विनची मूळ किंमत किंमत 2 कोटी रुपये होती.

रविचंद्रन अश्विनने 2009 मध्ये आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने 212 सामन्यांमध्ये 29.82च्या सरासरीने आणि 7.12च्या इकॉनॉमी रेटने 180 विकेट्स घेतल्या आहेत. 34 धावात 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. तो सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा संयुक्त पाचवा गोलंदाज आहे.
दुसरीकडे, फलंदाजीत त्याने 1 अर्धशतकाच्या मदतीने 800 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मोहम्मद शमीला 10 कोटी तर मिलरवर 7.5 कोटी रुपयांची बोली! या संघांकडून खेळताना दिसणार हे दिग्गज
IPL Mega Auction; आयपीएल विजेता कर्णधार ठरला अनसोल्ड!
केएल राहुलला मिळाले अवघे 14 कोटी रुपये! आरसीबी नाही तर या संघाने लावली सर्वात मोठी बोली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---