इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 29वा सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा दारुण पराभव केला. शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) एमए चिदंबरम स्टेडिअमवरील हा सामना चेन्नईने 7 विकेट्सने जिंकला. यासह हंगामातील चौथा विजय साकारला. चेन्नईचा संघ विजयी रथावर आरूढ असला तरी, काही प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्यांच्यापुढे आव्हान उभे आहेत. संघाचा प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या दुखापतीविषयी नुकतीच मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी अपडेट दिली.
आयपीएल 2023 लिलावात बेन स्टोक्स याला मोठी रक्कम देत चेन्नईने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. हंगामातील पहिल्या दोन सामन्यात सामील झाल्यानंतर स्टोक्स दुखापतग्रस्त झाला होता. पहिल्या दोन सामन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. तो किती दिवस मैदानापासून दूर राहणार याबाबत फारशी माहिती उपलब्ध होत नव्हती. मात्र, हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले,
“स्टोक्सबाबत फारशी चिंता करण्याची बाब नाही. तो अजून आठवडाभर आराम करेल. दुखापतीतून लवकर बरे होण्याचा त्याचा प्रयत्न आहे. केवळ अतिरिक्त ताण नको यासाठी तो आराम घेईल. लवकरच तो तुम्हाला संघात दिसेल.”
चेन्नईला केवळ स्टोक्स नव्हेतर इतर खेळाडूंच्या दुखापतींनी देखील सतावले आहे. अष्टपैलू कायले जेमिसन हा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाहेर झाला होता. त्याच्या जागी आलेला बदली खेळाडू सिसांडा मगाला याला देखील हाताचे दुखापत झाली असून तो दोन आठवडे मैदानाबाहेर असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज दीपक चहर हा देखील सध्या दुखापतीशी झुंज देतोय. त्याशिवाय मुकेश चौधरी हा देखील हंगामाच्या सुरुवातीपासून संघाचा भाग नाही.
(Chennai Super Kings Head Coach Stephen Fleming Give Update On Ben Stokes Injury In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयपुढे नमलं पाकिस्तान! आशिया चषकासाठी आला नवीन प्रस्ताव, जाणून घ्याच
नाणेफेक जिंकत गुजरात संघाचा फलंदाजीचा निर्णय, चौथ्या विजयासाठी पंड्यासेना सज्ज