मंगळवारी (दि. 23 मे) आयपीएल 2023चा पहिला क्वालिफायर सामना चेपॉक स्टेडिअममध्ये चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यात धोनीचा सीएसके संघ विजय मिळवून अंतिम सामन्यात एन्ट्री करण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी सीएसके आपला सर्वोत्तमवीर ऋतुराज गायकवाड अपयशी ठरावा अशी कदाचित प्रार्थना करत असेल.
गुजरात व चेन्नई यांनी साखळी फेरीत दमदार कामगिरी करताना पहिले दोन क्रमांक पटकावले. त्यानंतर आता पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. चेन्नईचे बरेचशे यश त्यांच्या सलामीवीरांवर अवलंबून असते. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडकडून इतरांना अपेक्षा असल्या तरी, कदाचित चेन्नई संघ तो मोठ्या धावा बनवू नये अशी अपेक्षा करत असेल. कारण, यापूर्वी ऋतुराजने चांगली कामगिरी केल्यानंतर चेन्नईला गुजरातविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे.
मागील वर्षी व या वर्षी मिळून गुजरात व चेन्नई यांच्या दरम्यान तीन सामने झाले आहेत विशेष म्हणजे या तीनही सामन्यात गुजरात संघ चेन्नईला पराभूत करण्यात यशस्वी झाला आहे. या तीन सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड याची कामगिरी पाहिल्यास ती दमदार दिसते. मागील वर्षी झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने 73 तर, दुसऱ्या सामन्यात 49 चेंडूवर 53 धावा त्याने केलेल्या. यावर्षी झालेल्या हंगामातील पहिल्याच सामन्यात ऋतुराजने पुन्हा एकदा आपला दम दाखवत 92 धावांची खेळी केली होती.
ऋतुराजची या हंगामातील एकंदरीत कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने डेवॉन कॉनवेसह संघाला जवळपास प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात दिली. ऋतुराज याने या हंगामात आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 42 च्या सरासरीने 504 धावा काढल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्याचा स्ट्राइक रेटही 148 पेक्षा अधिक दिसून येतो.
(Chennai Super Kings Hoping Ruturaj Gaikwad Might Not Scoring Against Gujarat Titans In Qualifier 1)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा रागराग करणाऱ्यांना हार्दिकने दोनच शब्दात केले गार; म्हणाला, ‘तसंच करायचंय ना मग…’
धोनी, हार्दिक, ईशान आणि कृणाल पंड्याने केली पार्टी? मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचताच व्हिडिओ व्हायरल