---Advertisement---

IPL 2023च्या पहिल्या क्वालिफायरसाठी चेन्नई-गुजरात सज्ज, एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती

Hardik-Pandya-And-MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीचा शेवट रविवारी (दि. 21 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स संघातील सामन्याने झाला. यानंतर आता स्पर्धा प्ले-ऑफच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात मंगळवारी (दि. 23 मे) खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये पार पडणार आहे. आयपीएल नियमांनुसार, पहिला क्वालिफायर सामना गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये खेळला जातो.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने 14 सामने खेळत 10 सामने जिंकले आणि 20 गुणांसह गुणतालिकेतील पहिले स्थान पटकावले. तसेच, महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने 14 सामने खेळताना 8 सामने जिंकले. तसेच, 17 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. आता पहिला क्वालिफायर सामना जो संघ जिंकेल, तो थेट अंतिम सामन्यात एन्ट्री करेल. तसेच, जो संघ पराभूत होईल, त्याला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. तो संघ एलिमिनेटरमध्ये जिंकणाऱ्या संघाविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.

चेन्नई विरुद्ध गुजरात (Chennai vs Gujarat) संघातील सामना खूपच रोमांचक होण्याची आशा आहे. चला तर या सामन्याविषयी सर्व गोष्टी जाणून घेऊयात.

चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023चा पहिला क्वालिफायर सामना कधी खेळला जाणार?
चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023चा पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी (दि. 23 मे) खेळला जाणार आहे.

चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023चा पहिला क्वालिफायर सामना कुठे खेळला जाणार?
चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023चा पहिला क्वालिफायर सामना चेपॉक स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे.

चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023चा पहिला क्वालिफायर सामना किती वाजता सुरू होईल?
चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023चा पहिला क्वालिफायर सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामना सुरू होण्याच्या अर्ध्या तास आधीच नाणेफेक होईल.

चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023च्या पहिल्या क्वालिफायर सामन्याचे लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल?
चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023च्या पहिल्या क्वालिफायर सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023च्या पहिल्या क्वालिफायर सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
चेन्नई विरुद्ध गुजरात संघातील आयपीएल 2023च्या पहिल्या क्वालिफायर सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ऍपवर पाहता येऊ शकते. (csk vs gt match preview live streaming know when and where to watch live telecast of 1st qualifier ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही सलग दुसऱ्यांदा फायनल…’, RCBचे स्वप्न धुळीस मिळवल्यानंतर गिलचे पहिल्या क्वालिफायरबद्दल भाष्य
आधी गळाभेट, मग ऑटोग्राफ! पराभवाचं दु:ख विसरून विराटने राशिदला केले खुश; व्हिडिओ जिंकेल तुमचंही मन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---