नव्या दमाचा युवा फलंदाज शुबमन गिल हा एकापाठोपाठ एक अशी यशाची शिखरे गाठत आहे. नुकतेच त्याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात जबरदस्त शतक साकारले. हे त्याचे हंगामातील सलग दुसरे शतक होते. त्याच्या या शतकामुळे त्याच्या गुजरात टायटन्स संघाचा शानदार विजय झाला. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा हंगामातील प्रवासही संपुष्टात आला. या सामन्यात गिलने 52 चेंडूत नाबाद 104 धावा करत विराट कोहली याच्या शतकी प्रयत्नांवर पाणी फेरले. आता हंगामातील पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी गिलने रणनीतीमागील खुलासा केला आहे.
काय म्हणाला गिल?
सामन्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) म्हणाला की, “मला माझ्या खेळाविषयी समज आहे. कोणत्याही खेळाडूसाठी हे खूपच महत्त्वाचे असते की, त्याने स्वत: समजले पाहिजे.” गुजरातला पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा सामना करायचा आहे. या सामन्याविषयी गिल म्हणाला की, महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) यांच्या संघाचा त्यांचे घरचे मैदान चेपॉकमध्ये चांगल्याप्रकारे सामना करण्यासाठी त्यांच्याकडे शानदार गोलंदाजी आक्रमण आहे.
गिल म्हणाला की, “मला वाटते की, त्या (चेन्नई) खेळपट्टीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे खूप चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. चेन्नईमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणे रोमांचक ठरेल. आशा आहे की, आम्ही सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात यशस्वी होईल.”
शतकाविषयी काय म्हणाला गिल?
आपल्या शतकाविषयी बोलताना गिल म्हणाला की, “ही चांगली सुरुवात करणे आणि त्यालाच मोठ्या धावसंख्येत बदलण्याशी संबंधित आहे. तुम्हाला तुमच्या रणनीती अंमलात आणण्याची गरज असते. तेच खूप महत्त्वपूर्ण असते.”
पहिला क्वालिफायर सामना
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) संघात खेळला जाणार आहे. हा सामना 23 मे रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (shubman gill talk about game plan against chennai super kings ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी गळाभेट, मग ऑटोग्राफ! पराभवाचं दु:ख विसरून विराटने राशिदला केले खुश; व्हिडिओ जिंकेल तुमचंही मन
गिलच्या विजयी षटकारामुळे मुंबई प्ले-ऑफ्समध्ये, RCB हारताच ‘पलटण’च्या खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल