---Advertisement---

आयपीएल तोंडावर असतानाही सीएसकेचा उपकर्णधार नाही निश्चित, रैना-जडेजा पडले पेचात! 

On: मंगळवार, एप्रिल 6, 2021 8:04 AM
---Advertisement---

येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात या हंगामाची पहिली लढत रंगणार आहे. तत्पुर्वी तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अडचणीत भर पडली आहे. आयपीएल तोंडावर असतानाही अजून त्यांनी संघाच्या उपकर्णधाराचे नाव घोषित केलेले नाही. यामुळे सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा पेटात पडले आहेत.

उपकर्णधाराविना संघ उतरणार मैदानात!
मिस्टर आयपीएल सुरेश रैना आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यांना उपकर्णधार पदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. परंतु अद्याप चेन्नई संघाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन याबाबत बोलताना म्हणाले की, “संघाच्या उपकर्णधाराबद्दलचा निर्णय आम्ही संघ व्यवस्थापनावर सोडला आहे. या निर्णयाबद्दल आम्हाला कसलीही घाई नाही. संघ व्यवस्थापन आयपीएलच्या पुढील चरणात याबाबतीत निर्णय घेईल.”

१० एप्रिल रोजी होणार चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना
आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आत्तापर्यंत आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघ गतवर्षी खास कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी चेन्नईचा संघ दमदार पुनरागमन चौथे जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळेल.

अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नईच्या या हंगामातील एकूण १४ सामन्यांपैकी १२ सामने रात्री ७.३० वाजता होतील. तर उर्वरित २ सामने दुपारी ३.३० वाजता होतील. १० एप्रिल रोजी मुंबईत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईची पहिली लढत होईल.

असे आहेत आयपीएल २०२१ मधील चेन्नई सुपर किंग्सचे साखळी फेरीतील सामने-

१० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई, दुपारी ३.३०
२८ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
५ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
७ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बंगळुरू, दुपारी ३.३० वाजता
१२ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता

चेन्नई सुपर किंग्स – २५ खेळाडू (८ परदेशी)

एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ चा मार्ग मोकळा! कोरोना सावटाखाली मुंबईच्या स्टेडियवमर सराव करण्याची मिळाली परवानगी

आयपीएल २०२१ : ‘हे’ आहेत आयपीएलच्या प्रत्येक संघाचे महागडे खेळाडू

सचिन लेक आयपीएल पदार्पणासाठी करतोय कसून सराव, पाहा त्याची अफलातून गोलंदाजी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---