इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा 29 मे रोजी संपुष्टात आली. 2021 नंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. गुजरात टायटन्स संघाला 5 विकेट्सने पराभूत करत एमएस धोनी याच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब नावावर केला. या हंगामात चेन्नईच्या यशात सलामीवीर डेवॉन कॉनवे याचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने स्पर्धेत चेन्नईसाठी सर्वाधिक धावा केल्या तसेच अंतिम फेरीत सामनावीर होण्याचा मान देखील मिळवला. त्यानंतर आता न्यूझीलंडला परतल्यानंतर त्याने सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
कॉनवे मागील हंगामापासून चेन्नईचा भाग आहे. त्याने सलग दुसऱ्या हंगामात संघासाठी आपले भरीव योगदान दिले. अंतिम सामन्यातही त्याच्यामुळे संघाला वेगवान सुरुवात मिळावी. मायदेशी परतल्यानंतर एका मुलाखतीत बोलताना त्याने चेन्नई सुपर किंग्स व धोनी यांचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला,
“मी सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल खेळलो. या वेळी अगदी अविस्मरणीय अनुभव मला आले. एमएस धोनी याला संपूर्ण देशभरात कमालीचे प्रेम मिळते. मी तर म्हणेल त्याची पूजा केली जाते. आम्ही हंगामात ज्या वेळी विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर खेळलो, त्यावेळी आम्हाला आमच्या घरच्या मैदानाची आठवण येत होती. सगळीकडे आम्हाला सारखाच पाठिंबा भेटला.”
या मुलाखतीत बोलताना त्याने म्हटले की, आतापर्यंतच्या माझ्या टी20 क्रिकेट कारकिर्दीतील हा सर्वच क्षण ठरला. कॉनवे याने यावर्षी आयपीएल मध्ये कमालीचे सातत्य दाखवले. त्याने संघासाठी 16 सामने खेळताना 51.69 च्या सरासरीने 672 धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. अंतिम सामन्यात चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावा करायचा असताना त्याने, वेगवान 47 धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला.
(Chennai Super Kings Opener Devon Conway Said Whole India Worship MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका फोनमुळे हुकलं होतं सेहवागचं पदार्पण, नाहीतर शारजाहमध्ये आलं असतं वादळ
खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एकाधिकारशाही आयपीएलमुळे संपली! डब्ल्यूटीसी फायनलआधी पॅट कमिन्सचे मोठे भाष्य