---Advertisement---

शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात चेन्नईच्या खेळाडूंचे हॉटेलमध्ये दणक्यात स्वागत, कुटुंबियांकडूनही जल्लोष

On: सोमवार, ऑक्टोबर 11, 2021 8:39 PM
---Advertisement---

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील क्वालिफायर १ चा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रविवारी (१० ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात चेन्नीने ४ विकेट्सने विजय मिळवत विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. चेन्नईच्या या विजयानंतर खेळाडूंचे हॉटेलमध्ये जंगी स्वागत झाले.

या सामन्यात दिल्लीने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने अर्धशतकं झळकावली होती. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारीही केली. उथप्पाने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. तर, ऋतुराजने ५० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. मोईन अलीने १६ धावांचे योगदान दिले.

तसेच अखेरच्या २ षटकात २४ धावांची गरज असताना धोनीने आक्रमक खेळ केला आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. त्याने अखेरच्या षटकात सलग तीन चौकार मारत चेन्नईच्या अंतिम सामन्यातील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. त्याने ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १८ धावा केल्या.

चेन्नईच्या खेळाडूंचे जंगी स्वागत 
या सामन्यानंतर जेव्हा चेन्नईचे खेळाडू हॉटेलमध्ये परतले, तेव्हा त्यांचे मोठ्या उत्साहात त्यांच्या कुटुंबियांकडून आणि स्टाफकडून स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की खेळाडू मैदानातून हॉटेलमध्ये प्रवेश करताच स्टाफ आणि तिथे उपस्थितीत असलेल्या सदस्यांकडून मोठमोठ्याने शिट्ट्या वाजवल्या जातात. तसेच या व्हिडिओमध्ये रविंद्र जडेजाची मुलगी त्याकडे पळत येताना दिसते. तोही तिला आनंदाने कडेवर उचलून घेतो. तसेच अन्य खेळाडूही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतात. त्यानंतर एकमेकांबरोबर आनंद व्यक्त केल्यानंतर सर्वजण आपपल्या रुमकडे निघतात.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1447509235231719424

चेन्नईचे नवव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश 
चेन्नई आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा अंतिम सामन्यात प्रवेश करणारा संघ आहे. चेन्नईने यंदा नवव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने यापूर्वी २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१८ आणि २०१९ साली आयपीएलच्या अंतिम सामन्यांत प्रवेश केला आहे. यातील २०१०, २०११ आणि २०१८ साली चेन्नईला विजेतेपद मिळवण्यात यश आले आहे. तर, २००८, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९ साली चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

https://www.instagram.com/p/CU3CMpHl3OU/

पंत-शॉचे अर्धशतक
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि रिषभ पंतने अर्धशतकं करत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात हातभार लावला. तसेच पंतबरोबर शिमरॉन हेटमायरने केलेली ८३ धावांची भागीदारीही महत्त्वाची ठरली.

शॉने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तसेच पंतने ३५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर हेटमायरने ३७ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

मैं तेरा जबरा फॅन हो गया; धोनीच्या खेळीनंतर शॉची मन जिंकणारी प्रतिक्रिया

पृथ्वी शॉने मारला खणखणीत षटकार, स्टँडमध्ये चाहत्याने पकडला अफलातून झेल, पाहा व्हिडिओ

हे जरा नवीनच! बीसीसीआयकडून करोडो कमावणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळतात आयपीएलमध्ये काही लाख

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---