आयपीएल २०२० चा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु साखळी सामन्यांमध्येच चार वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. चेन्नई संघ सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला. परंतु असे असले तरीही शेवटच्या ३ सामन्यात दमदार फलंदाजी करत चेन्नईच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. तो खेळाडू इतर कोणी नसून युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आहे. आयपीएलमधून संघ बाहेर पडल्यानंतर तो आपल्या घरी परतला. यावेळी त्याचा मोठा सन्मान करण्यात आला.
आई- वडिलांसह पिंपरी चिंचवडमधील जुनी सांगवीत राहतो
ऋतुराज गायकवाड आपल्या आई- वडिलांसह पिंपरी चिंचवडमधील जुनी सांगवीमध्ये राहतो. आयपीएलमध्ये शेवटच्या काही सामन्यात संधी मिळालेल्या या खेळाडूच्या घरी जावून आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी (५ नोव्हेंबर) त्याचा सत्कार केला. तसेच त्याची आयपीएल कारकीर्द व क्रिकेट कारकिर्दीची माहिती घेतली.
आयपीएल २०२० मधील कामगिरी
मंगळवारी म्हणजेच २२ सप्टेंबर २०२० रोजी ऋतुराज आपला पहिला सामना खेळला. एमएस धोनी नेतृत्त्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा तो भाग असून आतापर्यंत त्याने ६ सामन्यात ५१च्या सरासरीने २०४ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश असून त्याने ६ षटकार व १६ चौकार मारले आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही केली आहे धडाकेबाज कामगिरी
ऋतुराजने २१ प्रथम श्रेणी सामन्यात ३८.५४च्या सरासरीने १३४९ धावा केल्या आहेत. तर अ दर्जाच्या सामन्यात ४९च्या सरासरीने २४९९ धावा केल्या आहेत. ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात ३४ सामन्यात ३६च्या सरासरीने त्याने १०४७ धावा केल्या आहेत.
भारताचा पुढील स्टार फलंदाज म्हणून ऋतुराजकडे पाहिले जाते
ऋतुराजकडे भारतीय संघातील भविष्यातील स्टार फलंदाज म्हणून पाहिले जाते. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा त्याने तिचे सोने केले आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या रणजीपटूंमध्ये केदार जाधवनंतर भारतीय संघाकडून खेळणारा पुढचा क्रिकेट होण्याची मोठी संधी ऋतुराजकडे आहे. तो भारतीय क्रिकेट संघासाठी नक्कीच एक मोठी ‘ऍसेट’ ठरणार आहे.
-काय आहे भानगड? अर्धशतक झळकावले ऋतुराज गायकवाडने पण ट्रोल झाला धोनी
-CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
-मार्केट पडल्यावर ऋतुराज गायकवाडचा ट्रकभर कांदा मार्केटमध्ये, सीएसकेच्या विजयानंतर मीम्सचा पाऊस