मुंबई | आज आयपीएल २०१८च्या प्ले-आॅफला सुरुवात होत आहे. प्ले-आॅफमधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामना आज मुंबईमधील शेषराव वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्याला प्ले-आॅफमध्ये क्वाॅलिफायर-१ असे म्हटले जाते.
यात जो संघ जिंकणार आहे तो थेट अंतिम सामन्याला पात्र ठरणार आहे. तर पराभूत संघाला क्वालिफायर-२ मध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळणार आहे.
आज होणारा हा सामना ७ वाजता होणार आहे. प्ले-आॅफचे सामने तसेच अंतिम सामना हा ७ वाजता होणार आहे. आयपीएल २०१८च्या साखळी फेरीचे सर्व सामने एकतर दुपारी ४ वाजता किंवा ८ वाजता खेळवले गेले. परंतु प्ले-आॅफचे सामने मात्र ७ वाजता होणार आहेत.
आज जो क्वाॅलिफायर-१ चा सामना होणार आहे त्यापुर्वी आयपीएलमध्ये महिलांच्या आयपीएल लढतीचा श्रीगणेशा आहे. या सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली ट्रेलब्लेझर्सचा संघ आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सुपरनोवासचा संघ लढणार आहेत. हा सामना दुपारी २ वाजता होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–जर आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज पराभूत झाले तर….
–जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!
–तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!
–व्हिडिओ व्हायरल- मुंबई हारली, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुष
–कोण आहे रोहित शर्मा? शेजारी बसलेल्या प्रवाशाने रोहितला पाहताच काय केले पहा?