काहीजण असं म्हणतात की, क्रिकेट हा फक्त एक खेळ आहे. मात्र, असे नसून ही एक भावना आहे. याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा आला आहे आणि हे पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळाले आहे. जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्धी टी२० लीग इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२१मधील पहिला क्वालिफायर सामना रविवारी (१० ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला आणि चेन्नईने ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासोबतच चेन्नईने आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात धडक दिली.
सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १७२ धावांचा डोंगर उभा केला होता. तसेच चेन्नईला १७३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसच्या रूपात धक्का बसला. मात्र, त्यानंतर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने जबरदस्त कामगिरी करत धावफलक हलता ठेवला आणि आपली शतकी भागिदारीही पूर्ण केली.
मात्र, १४ व्या षटक टाकत असलेल्या टॉम करनने तिसऱ्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे उथप्पा (११३ धावसंख्येवर) आणि शार्दुल ठाकूरला (११७ धावसंख्येवर) श्रेयस अय्यरकडून झेलबाद केले. यानंतर फलंदाजीस आलेल्या अंबाती रायडूही ११९ धावसंख्येवर धावबाद झाला. यानंतर फलंदाजीला मोईन अली आला. मोईनने ऋतुराजला साथ देत धावफलक हलता ठेवला. दोघेही १४९ धावांपर्यंत टिकून होते. मात्र, ऋतुराज (५० चेंडूत ७० धावा) १८.१ षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर हर्षल पटेलच्या हातून झेलबाद झाला. त्यानंतर टॉम करन टाकत असलेल्या १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोईन अलीही कागिसो रबाडाच्या हातून झेलबाद झाला. यावेळी चेन्नईचे फलंदाज बाद होताना पाहून स्टेडिअममध्ये उपस्थित चाहते खूपच उदास दिसले. यातील चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले. (Chennai Super Kings Won Qualifier 1 By 4 Wickets Against Delhi Capitals, But This Girl Attract All )
रडू लागली चिमुकली
यादरम्यान मोईन अलीची विकेट जाताच स्टेडिअममध्ये उपस्थित चेन्नईची समर्थक असलेली चिमुकली मुलगी रडू लागली. यादरम्यानचे तिचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये ती हंबरडा फोडून रडताना दिसत आहे. मात्र, पुढे जे झालं त्याने कदाचित या चिमुकलीचे रडणे नक्कीच थांबले असावे.
CSK Is An Emotion 💛🥺#csk #CSKvDC #IPL2021 pic.twitter.com/RME8bcjl01
— Vιjαყ Dҽʋα 𝕋𝕍𝕂 (@VIJAY_DEVA_VFC_) October 10, 2021
Emotions 💛 #CSKvDC pic.twitter.com/RVCdHGaV97
— Ryan (@ryandesa_07) October 10, 2021
https://twitter.com/JesusLovesU97/status/1447266814832959489
#CSKvDC
If someone asks about the dhoni fanbase show them this pic :- pic.twitter.com/nfNiNoOBqf— Anand (@paradoxvella) October 10, 2021
एमएस धोनीने केली कमाल
दरम्यान ऋतुराज गायकवाडची विकेट गेल्यानंतर एमएस धोनी फलंदाजीसाठी आला होता. धोनीने १९ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर जोरदार षटकार लगावला आणि आव्हानापर्यंतची वाट सोपी केली. शेवटच्या षटकात १३ धावांची आवश्यकता होती. यावेळी स्ट्राईकवर असलेला मोईन अली करनच्या पहिल्याच चेंडूवर रबाडाच्या हातून झेलबाद झाला. यानंतर जडेजा खेळपट्टीवर आला खरा, पण स्ट्राईक धोनीकडे होती. धोनीने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावले. यानंतर करनने पुढील चेंडू वाईड टाकला. यावेळी चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर धोनीने चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार मारत सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
-मैदानात पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा धोनी ठरला पहिलाच खेळाडू
-प्रतिस्पर्धी चेन्नई म्हटलं की शॉची बॅट तळपतेच, पाहा खास आकडेवारी
-एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम