गेल्या महिन्याभरापासून तमिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेची धुमधाम सुरू होती. नुकताच या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. तमिळनाडू प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी(१५ ऑगस्ट) चेपॉक सुपर गिलीज विरुद्ध रुबी त्रिची वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. चेपॉक सुपर गिलीज संघाने रुबी त्रिची वॉरियर्सचा पराभव करून तामिळनाडू प्रीमियर लीग 2021 चे विजेतेपद मिळवले.
तमिळनाडू प्रीमियर लीगमधील चेपॉक संघाचे हे तिसरे जेतेपद आहे. अंतिम सामन्यात चेपॉक संघाने रुबी त्रिची वॉरियर्सचा 8 धावांनी पराभव केला. या विजयाचा नायक ठरला नारायण जगदीसन. त्याने 90 धावांची तुफानी खेळी खेळून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
चेपॉक सुपर गिलीज संघ तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये चेन्नई शहराचे प्रतिनिधित्व करतो. अंतिम फेरीत त्यांचा सामना झालेला रुबी त्रिची वॉरियर्स संघ तिरुचिरापल्ली शहराचे प्रतिनिधित्व करतो.
चेपॉक सुपर गिलीजने अंतिम सामन्यात विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याचा पाठलाग करताना रुबी त्रिची वॉरियर्स संघ 176 धावा पर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात चेपॉक संघाच्या तब्बल 7 खेळाडूंनी गोलंदाजी केली. चेपॉक संघाच्या सोनू यादवने 2 बळी घेतले. रुबी त्रिची वॉरियर्सच्या सर्वान कुमारने आपल्या झुंजार खेळीत नाबाद 45 धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
चेपॉक सुपर गिलीज संघाच्या विजयाचा नायक ठरलेल्या नारायण जगदीसनने 90 धावांची खेळी खेळून संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने सलामीला येत 58 चेंडूत 90 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने दोन षटकार आणि सात चौकारही मारले. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
🏆𝟐𝟎𝟏𝟕
🏆𝟐𝟎𝟏𝟗
🏆𝟐𝟎𝟐𝟏Congratulations @supergillies on your 3⃣rd #TNPL title! #ShriramCapitalTNPL2021 #RTWvCSG #TNPLFinal pic.twitter.com/72wk9vtuMV
— TNPL (@TNPremierLeague) August 15, 2021
यापूर्वी चेपॉक सुपर गिलीज संघाने 2017 आणि 2019 मध्ये तमिळनाडू प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले होते, हे संघाचे तिसरे जेतेपद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चुकीचा शॉट मारून आउट झालेल्या विराटवर चाहत्यांनी काढली भडास; केआरकेनेही ‘असे’ केले ट्रोल
गोष्ट वेस्ट इंडिजच्या अशा क्रिकेटरची, जो कायमच संघाचा तारणहार ठरला!