-अनिरुद्ध ढगे
चेस विश्वचषकात प्रथमच १० भारतीय खेळाडू भाग घेत आहे. इतर खेळाच्या विश्वचषकांच्या तुलनेत हा विश्वचषक बराच वेगळा असतो. कारण विश्वविजेता होण्यासाठी यानंतरही एक दोन टप्पे असतात.
ह्या विश्वचषक महत्वाचा यासाठी की या १२८ खेळाडूंपैकी जे २ खेळाडू अंतिम फेरीत जातील त्यांना Candidates (आव्हानवीर) स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो.
Candidates स्पर्धा ही मागच्या वेळचा विश्वचषक विजेता विरुद्ध कोण खेळणार हे निश्चित करण्यासाठीची स्पर्धा असते. इतर 4 खेळाडू वेगवेगळ्या मार्गानी निवडले जातात.
जस की मागच्या वेळी चीनच्या डिंग लिरेन अन आर्मेनियाच्या लिओन आरोनियन हे दोघ फायनलला गेल होते म्हणून हे आपोआप candidates स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.
यांच्यातील फायनल पण जबरदस्त झाली होती !! ज्याचा निकाल टाय ब्रेकरवर लागून आरोनियन विजयी झाला होता. पण candidates स्पर्धेत दोघांचा निभाव लागला नाही अन इटालियन अमेरिकन फॅबीओ कारूआना जिंकल्यामुळ कार्ल्सन विरुद्ध world championship मध्ये तो खेळला होता.
ह्या वर्ल्ड कपमध्ये जगभरातले १२८ खेळाडू खेळणार आहेत. ही स्पर्धा Knock out (बाद फेरी) स्वरूपाची असते. प्रत्येक फेरीत २ सामने असतात. एक पांढऱ्या सोंगट्या घेऊन अन दुसरी काळ्या सोंगट्या घेऊन. यात पण स्कोर सारखा राहिला तर Rapid…Blitz… Armageddon असे वेगवेगळे tie breaker पद्धतीने त्या फेरीतून पुढे वाटचाल मिळते.
https://twitter.com/chesscupugra/status/1171301316167122944?s=20
भारताचे या १२८ पैकी ११ खेळाडू पात्र ठरले आहेत परंतु विश्वनाथन आनंदनी दुसऱ्या एका स्पर्धेतून खेळण्यासाठी या वर्ल्ड कपमधून माघार घेतली आहे.
मागच्या वेळच्या विश्वचषकाला भारताचे ७ खेळाडू पात्र झाल होते त्या आघाडीवर भारताची यावर्षी प्रगती आहे. रशियाच्या खालोखाल संख्येने या स्पर्धेत भारताचेच खेळाडू सर्वाधिक आहेत.
कामगिरीच्या बाबतीत मात्र मागच्या वेळेला जरा निराशाच झाल होती. आनंद लवकरच धक्कादायकरित्या स्पर्धेबाहेर गेला होता. भारताकडून विदित गुजराथीचे प्रदर्शन सर्वात चांगले झाले होते अन त्यासोबत सेथुरामनचा पण खेळ चांगला झाल होता.
या वेळी जे १० जण आहेत त्यापैकी रेटिंगचा विचार न करता सर्वात जास्त अपेक्षा आहेत त्या नाशिकच्या विदित गुजराथीकडून. याचबरोबर निहाल सरीन, अरविंद चिदंबरम यांचं प्रदर्शन जास्त चांगलं होऊ शकतं. पाहु आता या स्पर्धेतून चेसच्या पटलावर कोणता नवा तारा चमकतोय का?
https://twitter.com/chesscupugra/status/1171301416486539264
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–व्हिडिओ: जेव्हा स्टार्कने घेतली विकेट त्याचवेळी पत्नी एलिसानेही मैदानात केला हा कारनामा
–कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत ‘असा’ कारनामा करणारा राशिद खान पहिलाच खेळाडू
–राशिद खानच्या अफगाणिस्तानने बांगलादेशला कसोटीत पराभूत करत रचला इतिहास