राशिद खानच्या अफगाणिस्तानने बांगलादेशला कसोटीत पराभूत करत रचला इतिहास

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज(9 सप्टेंबर) अफगाणिस्तानने 224 धावांनी विजय मिळवला.

अफगाणिस्तानचा हा कसोटी क्रिकेटमधील दुसरा विजय आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तान त्यांचा कसोटी क्रिकेटमधील केवळ हा तिसरा सामना खेळत होते.

त्यामुळे सर्वात कमी कसोटी सामने खेळून पहिले दोन विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाची अफगाणिस्तानने बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये पहिले 2 विजय मिळवले होते.

या यादीत अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ इंग्लंड आहे. इंग्लंडने पहिल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये पहिले 2 विजय मिळवले होते.

राशिद खानने नेतृत्व केलेल्या अफगाणिस्तान संघाने बांगलादेश विरुद्ध या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 342 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 205 धावा केल्या.

त्यामुळे अफगाणिस्तानने 137 धावांची आघाडी घेतली. या आघाडीसह अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात सर्वबाद 260 धावा करत बांगलादेशला 398 धावांचे आव्हान दिले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला दुसऱ्या डावात सर्वबाद 173 धावाच करता आल्या.

कसोटीत पहिले दोन विजय मिळवण्यासाठी संघांना खेळावे लागलेले सामने –

3 सामने – ऑस्ट्रेलिया/अफगाणिस्तान

4 सामने – इंग्लंड

9 सामने – पाकिस्तान

12 सामने – वेस्ट इंडीज

13 सामने – दक्षिण आफ्रिका

20 सामने – श्रीलंका

30 सामने – भारत

31 सामने – झिम्बाब्वे

55 सामने – न्यूझीलंड

60 सामने – बांगलादेश

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टॉप ३: चौथ्या ऍशेस कसोटीतील ‘सामनावीर’ स्टिव्ह स्मिथने केले हे खास ३ विक्रम

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धडे देणार हा मुंबईकर!

यूएस ओपन: राफेल नदालने जिंकले कारकिर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम

You might also like