भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धडे देणार हा मुंबईकर!

मुंबईचा माजी फलंदाज अमोल मुजुमदारची भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार अमोल मुजुमदार म्हणाला, ‘मला मागील आठवड्यात याबद्दल विचारण्यात आले होते आणि मी हे आव्हान स्विकारले. आंतरराष्ट्रीय संघाशी जोडले जाणे ही सन्मानाची गोष्ट आहे.’

44 वर्षीय मुजुमदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणीच्या 171 सामन्यांमध्ये 48.13 च्या सरासरीने 11167 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 30 शतके आणि 60 अर्धशतके केली आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये मुजुमदारने 113 सामन्यात 3286 धावा केल्या आहेत.

मुजुमदारने याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

दक्षिण आफ्रिका यावर्षीच्या भारत दौऱ्यात 15 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान 3 टी20 आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे. 15, 18 आणि 22 सप्टेंबरला तीन टी20 सामने खेळणार आहे. हे टी20 सामने अनुक्रमे धरमशाला, मोहाली आणि बंगळूरु येथे होतील.

त्यानंतर 2 ऑक्टोबर पासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना विशाखापट्टणमला 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान रांचीत होणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

यूएस ओपन: राफेल नदालने जिंकले कारकिर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम

यूएस ओपन: १९ वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने सेरेनाला पराभूत करत मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

२ वेळा संधी मिळूनही पॉटिंग, क्लार्कला जे जमले नाही ते टिम पेनने पहिल्याच प्रयत्नात करुन दाखवले

You might also like