टॉप ३: चौथ्या ऍशेस कसोटीतील ‘सामनावीर’ स्टिव्ह स्मिथने केले हे खास ३ विक्रम

मँचेस्टर। ऑस्ट्रेलियाने रविवारी(8 सप्टेंबर) चौथ्या ऍशेस कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध 185 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच 5 सामन्यांच्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात स्टिव्ह स्मिथने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 211 धावांची द्विशतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने 82 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे स्मिथला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या ऍशेस मालिकेतील स्मिथचा दुसरा सामनावीर पुरस्कार आहे. तसेच इंग्लंड विरुद्धचा कसोटीतील हा स्मिथचा 7 वा सामनावीर पुरस्कार आहे. याबरोबरच स्मिथने 3 खास विक्रम केले आहेत.

सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या स्मिथने केले हे विक्रम –

#एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू 

7 – स्टिव्ह स्मिथ – विरुद्ध इंग्लंड

7 – कर्टली अँब्रोस – विरुद्ध ऑस्ट्रेलिया

6 – इयान बॉथम – विरुद्ध ऑस्ट्रेलिया

6 – कुमार संगकारा – विरुद्ध पाकिस्तान

5 – सचिन तेंडुलकर – विरुद्ध ऑस्ट्रेलिया

5 – रिकी पॉटिंग – विरुद्ध इंग्लंड

5 – मुरलीधरन – विरुद्ध बांगलादेश

5 – शेन वॉर्न – विरुद्ध इंग्लंड

#कसोटीत सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू – 

17 – शेन वॉर्न

16 – रिकी पॉटिंग

14 – स्टिव्ह वॉ

11 – ऍलेन बॉर्डर, ग्लेन मॅकग्रा, स्टिव्ह स्मिथ

10 – मॅथ्यू हेडन

#ऍशेसमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू –

7 – स्टिव्ह स्मिथ

5 – इयान बॉथम, रिकी पॉटिंग, शेन वॉर्न

4 – मिशेल जॉन्सन, ग्लेन मॅकग्रा

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धडे देणार हा मुंबईकर!

यूएस ओपन: राफेल नदालने जिंकले कारकिर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम

यूएस ओपन: १९ वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने सेरेनाला पराभूत करत मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

You might also like