कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत ‘असा’ कारनामा करणारा राशिद खान पहिलाच खेळाडू

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज(9 सप्टेंबर) अफगाणिस्तानने 224 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयात कर्णधार राशिद खानने महत्त्वाचा वाटा उचलला.

राशिदने या सामन्यात गोलंदाजी करताना पहिल्या डावात 5 विकेट्स तर दुसऱ्या डावात 6 विकेट्स अशा मिळून एकूण 11 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने फलंदाजी करताना पहिल्या डावात 51 धावांची खेळीही त्याने केली. विशेष म्हणजे राशिदचा हा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता.

त्यामुळे कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी आणि त्याच सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा राशिद पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

तसेच एका कसोटी सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी आणि 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा राशिद एकूण तिसराच कर्णधार ठरला आहे. याआधी पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍलेन बॉर्डर यांनी असा कारनामा केला आहे.

इम्रान खान यांनी भारताविरुद्ध 1983 मध्ये फैसलाबादला झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व करताना 117 धावांची खेळी केली होती. तसेच 11 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ऍलेन बॉर्डर यांनी 1989 मध्ये सिडनीला झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना 75 धावांची खेळी केली होती आणि 11 विकेट्स घेतल्या होत्या.

त्याचबरोबर राशिद हा कसोटी सामना जिंकणारा सर्वात युवा कर्णधारही ठरला आहे.

#एकाच कसोटी सामन्यात 50+ धावांची खेळी आणि 10+ विकेट्स घेणारे कर्णधार –

इम्रान खान (117 धावा, 11 विकेट्स) विरुद्ध भारत, फैसलाबाद, 1983

ऍलेन बॉर्डर (75 धावा, 11 विकेट्स) विरुद्ध वेस्ट इंडीज, सिडनी, 1989

राशिद खान (51 धावा,11 विकेट्स) विरुद्ध बांगलादेश, चात्तोग्राम, 2019

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

राशिद खानच्या अफगाणिस्तानने बांगलादेशला कसोटीत पराभूत करत रचला इतिहास

टॉप ३: चौथ्या ऍशेस कसोटीतील ‘सामनावीर’ स्टिव्ह स्मिथने केले हे खास ३ विक्रम

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धडे देणार हा मुंबईकर!

You might also like