शनिवारी (२४ एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान संघाने अनुभवी ओएन मॉर्गनच्या कोलकाता संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान संघात नव्याने सहभागी झालेल्या चेतन सकारियाने एक डोळ्याचे पारणे फेडणारा झेल टिपला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सकारियाला राजस्थान संघाने १.२० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तो पहिल्या सामन्यापासूनच संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून येत आहे.
तर झाले असे की, १८ व्या षटकात राजस्थान संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी ख्रिस मॉरिस आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाज दिनेश कार्तिकने कव्हरच्या वरून चौकार मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न फसला आणि तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या सकारियाने कुठलीही चूक न करता हवेत उडी मारत अप्रतिम झेल टिपला. हा झेल पाहून स्वतः कार्तिक देखील आश्चर्यचकित झाला होता.
हा झेल टिपल्यानंतर सकारियाचे आगळेवेगळे सेलिब्रेशन पाहायला मिळाले होते. त्याने पक्षासारखे हात पसरवत सेलिब्रेशन करायचे दिसून आले.
https://twitter.com/ICT_SRHFAN/status/1385985779239768064?s=20
राजस्थान संघाचा आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसरा विजय आहे. हा संघ ४ गुणांसह गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर आहे. या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १३३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेला जोस बटलर (५ धावा) लवकर माघारी परतला होता. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने मोर्चा सांभाळत नाबाद ४२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तसेच यशस्वी जयसवालने (२२ धावा) आणि शिवम दुबेने देखील (२२ धावा) योगदान दिले. शेवटी डेविड मिलरच्या नाबाद २४ धावांच्या खेळीमुळे राजस्थान संघाने ७ चेंडू शिल्लक असतानाच ६ गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
कमिन्सचा जोरदार बाउन्सर आदळला बटलरच्या हेल्मेटवर, थांबवावा लागला सामना; पाहा तो क्षण
अरेरे! ‘डायमंड डक’ होणारा मॉर्गन आयपीएलमधील तिसरा कर्णधार; यापूर्वी ‘हे’ दोन खेळाडूही या यादीत सामील






