भारताच्या कसोटी संघातील विश्वासाच्या खेळाडूपैकी एक असलेला चेतेश्वर पुजारा. त्याने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे, मात्र अलिकडे त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर प्रश्न निर्माण होत आहेत. कारण मागील अनेक सामन्यांमध्ये तो धावा करण्यात अपयशी ठरला आहे. खेळपट्टीवर तग धरून संथ गतीने खेळणारा पुजारा आता आणखी एका नव्या संघाकडून खेळताना आपल्याला दिसणार आहे. याबाबत त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत माहिती दिली आहे.
भारतीय पुरूष कसोटी संघाची अभेद्य भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा (CheteShwar Pujara) याने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याने निळ्या रंगाच्या जर्सीत त्याचा फोटो पोस्ट करताना त्याला ओळखा पाहू मी कोणत्या संघाकडून खेळणार आहे, असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये त्या जर्सीवर ‘पुजारा’ हे नाव असून त्याने सोमवारी (10 ऑक्टोबर) संघाचे नाव घोषित करणार हे सांगितले आहे.
पुजारा हा केवळ भारताच्या कसोटी संघाचा भाग आहे, मात्र मागील काही सामन्यांमध्ये तो फॉर्ममध्ये दिसला नाही. यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. तसेच त्याने काऊंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या मैदानावर गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या इराणी चषकात तो साजेशी कामगिरी करू शकला नाही.
पुजाराच्या या पोस्टवर चाहत्यांच्याही भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील काहींनी तो रणजी ट्रॉफीमध्ये वेगळ्या संघाकडून खेळणार आहे, असे तर्कवितर्क लावले आहेत. काही चाहते त्याने जाहिरातीबाबत पोस्ट केले असेल अशाही कमेंट्स केल्या आहेत.
It feels great to start this new innings!
Can you guess my new team's name?
Stay tuned for more updates! #NewTeam #Cricket #Surprise pic.twitter.com/2fUPZbTXql
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) October 7, 2022
पुजाराने भारताकडून 96 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 43.82च्या सरासरीने 6792 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 18 शतके, 3 द्विशतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. भारताकडून त्याने शेवटचा सामना इंग्लंड विरुद्ध खेळला आहे. एजबस्टन येथे झालेल्या या सामन्यात तो शुबमन गिलसोबत सलामीला आला होता. त्या सामन्यात तो पहिल्या डावात 13 आणि दुसऱ्या डावात 66 धावा करत बाद झाला. तो सामना भारताने 7 विकेट्सने गमावला होता. तसेच त्याने भारताकडून 5 वनडे सामनेदेखील खेळले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा चेन्नई दौरा गाजला, विमानतळावरील फोटो वेधत आहेत लक्ष
MCA Election 2022: पवार-शेलार गटात रंगणार कलगीतुरा! संदीप पाटील पवार गटाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार
नाद करायचा नाय! पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला बांगलादेशकडून घेतला, टीम इंडिया पुन्हा टेबल टॉपर