ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी झगडताना दिसत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सामन्यावर वर्चस्व होते. मात्र पाचव्या दिवशी (११ जानेवारी) चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत या भारतीय फलंदाजांच्या जोडीने शतकी भागिदारी रचत सामन्याचा कायापालट केला. दरम्यान पुजाराने कसोटी कारकिर्दीतील ६००० धावांचा आकडा गाठला.
ऑस्ट्रेलियात सहा हजार धावा करणारा पुजारा दुसरा भारतीय
कसोटी स्पेशलिस्ट पुजारा २०५ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ७७ धावा करत त्रिफळाचीत झाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने त्याची दांडी उडवली. तत्पुर्वी डावातील ७५.४ षटकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनच्या चेंडूवर चौकार मारत पुजाराने कसोटी कारकिर्दीतील ६००० धावा पूर्ण केल्या. यासह ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील ६००० धावा पूर्ण करणारा पुजारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
पुजारापुर्वी द वॉल राहुल द्रविड याने २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील ६००० धावांचा आकडा गाठला होता.
पुजारा ठरला अकरावा भारतीय कसोटीपटू
याव्यतिरिक्त पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करणारा अकरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. सर्वप्रथम लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी हा किर्तिमान मिळवला होता. १९८१ ला गावसकरांनी आपल्या कसोटी कारकिर्दीतील ६००० धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच गुंडप्पा विश्वनाथ (१९८३), दिलीप वेंगसरकर (१९८७) आणि मोहम्मद अझरुद्दीन (१९९९) यांनी १९व्या शतकात कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावांची नोंद केली होती.
तर २०व्या शतकात कसोटीत ६ हजार धावा करण्याची खास कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडूलकरचे नाव सर्वात आधी येते. त्याने २००० ला हा पराक्रम केला होता. तर राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग या भारतीय दिग्गजांनी कसोटीतील ६ हजार धावांचा आकडा ओलांडला आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये हा पराक्रम करणाऱ्या फलंदाजांमध्ये पुजाराबरोबर विराट कोहलीचे नाव येते. त्याने २०१८ मध्ये कसोटी कारकिर्दीतील ६ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुजाराचा अनोखा विक्रम
३२ वर्षीय पुजाराने ऑक्टोबर २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे कसोटी कारकिर्दीतील पहिली धाव त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. त्यानंतर कसोटीतील हजारी धावांचा आकडाही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच केला आहे. १ हजार आणि २ हजार धावांचा आकडा पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण केला होता. तर कसोटी कारकिर्दीतील ५ हजार धावा करतेवेळीही विरोधक ऑस्ट्रेलिया संघच होता. शिवाय नुकत्याच त्याने ६ हजार धावाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण केल्या आहेत.
परदेशात पहिल्यांदाच पुजाराने झळकावले अर्धशतक
सिडनी कसोटीच्या चौथ्या डावात नॅथन लायनच्या चेंडूवर चौकार मारत पुजाराने कारकिर्दीतील २७ वे अर्धशतक झळकावले. खास बाब ही ठरली की, पुजाराने पहिल्यांदा परदेशातील मैदानावर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात पन्नाशीपार धावा केल्या. यापुर्वी मायदेशात २ वेळा त्याने ही खास कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, या दोन्ही वेळेला त्याचा विरोधक ऑस्ट्रेलिया संघच हा होता.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND Test Live: आता जबाबदारी अश्विन-विहारीवर; भारताला अद्याप १२७ धावांची गरज
वाढदिवस विशेष: राहुल द्रविड – भारतीय क्रिकेटचा ‘ध्रुव’ तारा
वाढदिवस विशेष: क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू