---Advertisement---

पुजाराच्या हाती लागला मोठा करार! आता ‘या’ देशात रचणार धावांचा डोंगर

On: मंगळवार, ऑक्टोबर 25, 2022 12:09 AM
cheteshwar-sussex
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा हा सध्या केवळ कसोटी क्रिकेट खेळतो. भारतासाठी कसोटी खेळत असला तरी, त्याला आयपीएलमध्ये संधी मिळत नाही. त्यामूळे तो मागील दोन वर्षापासून इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना दिसला. इंग्लंडचा प्रसिद्ध काउंटी क्लब ससेक्ससाठी त्याने दोन हंगाम खेळले. त्यानंतर पुन्हा एकदा आता तो त्याच संघासाठी खेळताना दिसणार आहे. पुजारा 2023 हंगामात ससेक्स संघासाठी खेळणार याची अधिकृत घोषणा नुकतीच केली गेली.

ससेक्स काउंटी संघाचे परफॉर्मन्स डायरेक्टर यांनी पुजारा पुढील हंगाम देखील आपल्याच संघासाठी खेळणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले,

“ही नक्कीच आनंदाची बातमी आहे की, पुजारा पुन्हा एकदा आपल्या संघासाठी खेळणार आहे. मागील हंगामात त्याने आपल्या बॅटमधून एका उच्च दर्जाचा खेळ दाखवला. यासोबतच आमच्या संघातील युवा खेळाडूंना तो एक आदर्श वाटतो.”

पुजाराने याला उत्तर देताना म्हटले,

“मागील हंगामात मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. आता पुन्हा एकदा मी तशाच प्रकारचा अनुभव घेऊ इच्छितो. संघाच्या सफलतेत आणि यशात मला योगदान द्यायचे आहे.”

रॉयल लंडन कपमध्ये कर्णधार म्हणून ससेक्ससाठी 9 सामने खेळताना त्याने 89 पेक्षा जास्तच्या सरासरीने आणि 3 शतकांच्या मदतीने 624 धावा काढल्या. विशेष म्हणजे यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 111 असा प्रभावी राहिला. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो.

पुजाराने यावर्षी ससेक्स काउंटी संघासाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाच शतकांच्या मदतीने व १०९.४३ च्या सरासरीने ७६६ धावा केल्या होत्या. अखेरच्या दोन सामन्यात त्याला संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी लाभली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापेक्षा टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढली, मोडीत निघाले सर्व विक्रम
अस कस घडल! विराट पाकची पिसे काढत असताना बिघडली भारताची अर्थव्यवस्था; वाचा संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---