भारतीय कसोटी संघाची भिंत म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ससेक्ससाठी काउंटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्यानंतर, इंग्लंडमधीलच प्रमुख वनडे चषकात त्याची चमकदार कामगिरी सुरूच आहे. पुजाराने सरेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. याआधी त्याने वॉर्विकशायरविरुद्ध ७३ चेंडूत शतक झळकावले होते.
दोनच दिवसांपूर्वी झालेल्या ससेक्स विरूद्ध वॉर्विकशायर सामन्यात ३११ धावांचा पाठलाग करताना पुजाराने ७३ चेंडूंमध्ये आक्रमक शतक झळकावले होते. मात्र, त्याच्या या शतकी खेळीनंतरही संघाला चार धावांनी अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे पुजारा काहीसा निराश झालेला.
https://twitter.com/SussexCCC/status/1558809479025664002?t=OMkrvjDa7W40ZxMLPm-Onw&s=19
रविवारी (१४ ऑगस्ट) झालेल्या ससेक्स विरूद्ध सरे सामन्यात पुन्हा एकदा त्याचाच आक्रमक अवतार पाहायला मिळाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या पुजाराने १०३ चेंडूवर आपले सलग दुसरे शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याचे आणखी रौद्र रूप पाहायला मिळाले. त्याने पुढील ७४ धावा अवघ्या २८ चेंडूत कुटल्या. १३१ चेंडूवर २० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने त्याने १७४ धावा केल्या. ससेक्स संघाकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये नोंदवली गेलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याच्यासह टीम क्लार्क यानेदेखील शतक ठोकले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर ससेक्सने निर्धारित ५० षटकात ६ बाद ३७८ धावा बनविल्या.
पुजाराने यावर्षी ससेक्स काउंटी संघासाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाच शतकांच्या मदतीने व १०९.४३ च्या सरासरीने ७६६ धावा केल्या होत्या. अखेरच्या दोन सामन्यात त्याला संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी लाभली होती. त्यानंतर आता या वनडे स्पर्धेतही कर्णधार म्हणून आपले योगदान देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेगाचा बादशहा नॉर्किएला मिळाला नवा संघ; युवा प्रिटोरियसचेही उजळले नशीब
रिषभ-उर्वशी वाद| पंतची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत; आता म्हणतोय…
बाबर आझमचं टेन्शंनं वाढलंय! पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी ‘या’ देशाने जाहिर केलाय मजबूत संघ






