---Advertisement---

पुजाराचा स्ट्राईक रेट पाहून तुम्ही म्हणाल, “अरे हा तर टी20 स्पेशालिस्ट”; खेळलीये धमाकेदार खेळी

On: शुक्रवार, ऑक्टोबर 14, 2022 5:34 PM
---Advertisement---

देशातील प्रमुख टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा हंगाम सुरू झाला आहे. विविध मैदानांवर देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. त्याचवेळी सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणारा भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा हा चर्चेत आला आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याने आक्रमक अर्धशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

इंदोर येथे सुरू असलेल्या एलिट डी गटातील सामन्यात सौराष्ट्राचा सामना नागालँड संघाशी झाला. इंग्लंडमध्ये शानदार कामगिरी केलेल्या पुजाराने या सामन्यात संघासाठी सलामी दिली. तरंगवेल लवकर बाद झाल्यानंतर त्याने समर्थ व्याससह संघाचा डाव सावरला. त्यांनी अवघ्या 58 चेंडूंवर 124 धावांची वेगवान भागीदारी केली. पुजाराने 27 चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 35 चेंडूंवर 9 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 62 धावा कुटल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 177.14 असा राहिला.

दुसऱ्या बाजूला समर्थ व्यास यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत 7 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 51 चेंडूत 97 धावा केल्या. सौराष्ट्राने निर्धारित 20 षटकात 5 बाद 203 अशी मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्राच्या सर्वच गोलंदाजांनी शानदार कामगिरी केल्याने नागालँड संघ या धावसंख्येच्या आसपासही पोहोचू शकला नाही. परिणामी त्यांना मंजू कसा 97 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला.

दिवसातील इतर सामन्यांमध्ये सर्व प्रमुख संघांनी विजय संपादन केला. कर्नाटक, पंजाब, मुंबई, केरळ व उत्तर प्रदेश यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याने झळकावलेले दमदार शतक या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबो! भारत अन् पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड बनला चाहत्यांचा आवडता सामना, सर्व तिकिटांची विक्री
‘हुड्डा आ जाएगा मैं चला…’, हे काय बोलून गेला विराट? व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---