---Advertisement---

पुजारा बाद तर झाला परंतु इंग्लंडला टेन्शन देऊन गेला

On: सोमवार, ऑगस्ट 20, 2018 7:05 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीत भारताने ७२ षटकांत ३ बाद २२५ धावा केल्या आहेत. या भक्कम धावसंख्येत पुजाराच्या ७२ धावांचा वाटा मोठा आहे.

७२ धावांची ही खेळी करताना त्याने तब्बल २०८ चेंडूंचा सामना केला. त्याला बेन स्टोक्सने स्लिपमध्ये झेल द्यायला भाग पाडले.

याबरोबर त्याने एक पराक्रमही केला आहे. इंग्लंडमध्ये कसोटीत गेल्या तीन दौऱ्यात एका डावात २००पेक्षा जास्त चेंडू खेळणारा तो केवळ चौथा खेळाडू ठरला आहे.

यापुर्वी राहुल द्रविडने २०११मध्ये तीन डावांत २०० पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला होता तर २०१४मध्ये मुरली विजयने एका डावात २००पेक्षा जास्त चेंडू खेळले होते.

या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने २२५ चेंडूंचा सामना करताना १४९ धावा केल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव

एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक

एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment