---Advertisement---

हे माहित आहे का? साउथॅम्टनमध्ये कसोटी शतक करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय क्रिकेटपटू

On: गुरूवार, जून 10, 2021 7:50 PM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघा आठवड्याचा कालावधी उरला आहे. या सामन्याच्या निमित्ताने माजी खेळाडू क्रिकेट जाणकार आणि क्रिकेटचे चाहते वेगवेगळ्या मुद्यांवरून आपले मत मांडत आहेत. अनेक जाणकारांचे असे म्हणणे आहे की, येत्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे पारडे जड आहे. कारण त्यांना सराव करायला पुरेसा वेळ मिळाला आहे जो भारतीय संघाला नाही मिळाला.

परंतु, भारतीय संघाच गेले २ वर्ष परदेशात प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्यामुळे भारतीय संघ सुद्धा न्यूझीलंड संघला कडवे आव्हान देईल यात काही शंकाच नाही. भारतीय संघाकडे भक्कम अशा फलंदाजीचा भरणा आहे, ज्याच्या जोरावर भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकू शकतो.

पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? येणारा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ‘साउथॅम्पटनच्या रोज बाउल’ मैदनावर होणार आहे आणि या मैदनावर भारतीय संघाकडून केवळ एका फलंदाजाने शतक केले आहे. जाणून घेऊ या कोण आहे तो फलंदाज.

भारतीय संघाकडून साउथॅम्पटनच्या रोज बाउलवर शतक करणारा दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा ‘कसोटी स्पेशालिस्ट’ चेतेश्वर पुजारा आहे. या बाबतीत काहीच शंका नाही की, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुजाराच योगदान खूप महत्वाच असणार आहे. तो भारतीय संघाचा अनुभवी आणि सर्वाधिक भरवशाच्या फलंदाज आहे. एकदा का त्याने अर्धा-पाऊन तास खेळपट्टीवर काढला तर, त्याला बाद करणे न्यूझीलंडच्या गोलंदाजाना कठीण जाणार.

पुजाराने इंग्लंडच्या वातावरणात आजवर ९ सामने खेळले त्यात त्याने ५०० धावा केल्या आहेत आणि भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे त्याने एक शतकसुद्धा केले आहे, तेसुद्धा साउथॅम्पटनच्या रोज बाउलच्या मैदनावर. त्या सामन्यात त्याने १३२ नाबाद धावा केल्या होत्या.  या वेळेससुद्धा पुजारा कडून भारतीय संघाला हीच आशा आहे. पुजाराला एक बाजूने आपली खिंड लढवत राहावी लागणार आणि एक मोठी खेळी करावी लागणार.

पुजाराने शेवटचे शतक ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०१८-१९च्या दौऱ्यावर मारले होते. त्यानंतर पुजाराने ५०-६० धावांचा आकडा पार केला परंतु, त्याचे रुपांतर शतकात करता आले नाही. भारतीय समर्थक हीच आशा लावून बसले की, अंतिम सामन्यात पुजाराकडून एक शतक जरूर निघेल आणि भारतीय संघ इतिहास रचण्यात सफल राहील.

महत्त्वाच्या बातम्या – 

खऱ्या अर्थाने दिग्गज! मैदानात उतरताच अँडरसन ठरला इंग्लंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू

‘हे गाणे आणि सुर्यास्त’,पीएसएल स्पर्धेपूर्वीच राशिद खानने केला सुंदर व्हिडिओ शेअर; दिसला वेगळ्याच अंदाजात

‘विश्वचषक २०११च्या सेमी फायनलमध्ये मी असतो, तर भारतीय फलंदाजांची हाडे खिळखिळी केली असती’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---