---Advertisement---

वेदनादायक सुरुवात! बॉक्सिंग डे कसोटीत पुजारा शुन्यावर बाद; ‘हा’ नकोसा विक्रमही केलाय नावावर

Cheteshwar-Pujara
---Advertisement---

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर (SuperSport Park) खेळला जात असून रविवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी मात्र, भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याच्या नावावर काही नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. 

पुजारा शुन्यावर बाद 
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी योग्य ठरवताना ११७ धावांची सलामी भागीदारी केली. मात्र, मयंक ४१ व्या षटकात ६० धावा करून बाद झाला. तो बाद झाल्याच्या पुढच्याच चेंडूवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला पुजाराला (Cheteshwar Pujara) लुंगी एन्गिडीने शुन्यावर बाद केले. पुजाराचा झेल किगन पीटरसनने घेतला.

त्यामुळे पुजारा हा कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. या नकोशा विक्रमात त्याने दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मागे टाकले आहे. दिलीप वेंगसरकर ८ वेळा आणि राहुल द्रविड ७ वेळा कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शुन्यावर बाद झाले आहेत. (Most ducks for India at No.3 in Test)

पुजाराने आत्तापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर ८७ कसोटी सामन्यात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने ४४.९६ च्या सरासरीने ६०२५ धावा केल्या असून १७ शतके आणि २९ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. याव्यतिरिक्त तो ९ वेळा शुन्यावर बाद झाला आहे.

अधिक वाचा – पुजारा-रहाणेला जुन्या रंगात आणण्यासाठी महागुरूने घेतली धोनीच्या ‘शागीर्द’ची मदत, व्हिडिओ व्हायरल

चालू वर्षात तिसऱ्यांदा शुन्यावर बाद 
पुजारा २०२१ वर्षात तिसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला आहे. याआधी तो इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद कसोटीत आणि न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत शुन्यावर बाद झाला होता. एकाच वर्षात कसोटीमध्ये २ किंवा त्यापेक्षा अधिकवेळा शुन्यावर बाद होण्याची पुजाराची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१८ साली देखील तो ३ वेळा शुन्यावर बाद झाला होता.

व्हिडिओ पाहा – आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत 

पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
पुजारा जरी पहिल्या दिवशी शुन्यावर बाद झाला असला, तरी केएल राहुलने आपल्या शतकी खेळीने हा दिवस गाजवला. त्याने पहिल्या दिवसाखेर १२२ धावांची नाबाद खेळी केली. त्याला मयंक अगरवाल व्यतिरिक्त कर्णधार विराट कोहलीनेही चांगली साथ दिली. विराट ३५ धावा करून बाद झाला. नंतर दिवसाखेरपर्यंत राहुलला अजिंक्य रहाणेची साथ मिळाली. रहाणेने पहिल्या दिवसाखेर नाबाद ४० धावा केल्या. त्यामुळे भारताला पहिल्या दिवशी ९० षटकात ३ बाद २७२ धावांपर्यंत मजल मारता आली.

महत्त्वाच्या बातम्या – 

शतक एक विक्रम अनेक!! केएल राहुलने शतकी खेळीसह केले ‘हे’ विक्रम नावावर; सचिन-कोहलीच्या पंक्तीत स्थान

विश्वचषक २०११ विजेत्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेल्या बॅटवर तब्बल ‘इतक्या’ लाखांची बोली; वॉर्नरच्या जर्सीला सर्वाधिक किंमत

भारताचे ‘हे’ ३ खेळाडू २०२१ वर्षात फ्लॉप! संघात जागा टिकवण्यासाठी करावी लागेल दमदार कामगिरी

आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत | Batsman without Ducks in ODI Cricket

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---