कोरोना व्हायरसमुळे भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून भारत सरकारने हा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटी असो किंवा खेळाडू असो आपापल्या घरी परिवारासोबत वेळ घालवत होते. जेव्हा भारत सरकारने सर्वच गोष्टींवर ती बंदी घातली होती, तेव्हा केस कापण्यापासून ते आपली तंदुरुस्ती राखण्यापर्यंत सर्वच कामे सर्वांना आपल्या घरी करावे लागत होते. याच दरम्यानचा भारतीय संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये पुजाराने आपल्या पत्नीचे केस कापण्याच्या कौशल्याबाबत खुलासा केला आहे आणि त्यावर एक मजेशीर कमेंट देखील केली आहे. हा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पुजारा इंस्टाग्रामवर त्याने पोस्ट केलेल्या विविध फोटोंबद्दल किस्से सांगत आहे. यावेळी त्याला त्याची पत्नी त्याचे केस कापत असतानाच्या फोटोबद्दल विचारण्यात आले.
याबद्दल पूजाराने व्हिडिओमध्ये सांगितले की, ‘पूजाने माझे फक्त एकदाच केस कापलेले आहेत. मी फक्त एकदाच केस कापण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मी कधीच हा प्रयत्न पुन्हा केला नाही. जरा हसत पुढे म्हणाला की, माझ्या डोक्यावर कोणताही निशाण नाही. मला माझे केस छान हेअरकट ठेवायला आवडते. हा सध्याचा कट देखील चांगला आहे, पण आणखी चांगला होऊ शकला असता.’
✂️ Trusting his wife to cut his hair
🦁 Going on safari with the @BCCI
🇮🇳 Winning the Border-Gavaskar Trophy in 2020/21Insta Memories with @cheteshwar1.#WTC21 #INDvNZ pic.twitter.com/xgMqM0hJ2e
— ICC (@ICC) June 22, 2021
भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पूजा त्याचा हेअरकट करत असतानाचा फोटो पोस्ट केला होता. पुजाराने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “99 धावांवर फलंदाजी करत असताना 1 धावासाठी साथीदारावर विश्वास ठेवणे आणि केस कापताना आपल्या पत्नीवर विश्वास ठेवणे, यातील कोणती गोष्ट जास्त धाडसी आहे.”
https://www.instagram.com/p/CAUqyemjp39/
याच व्हिडिओमध्ये पुजाराने सांगितले की, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा गाबा कसोटी जिंकणे अविस्मरणीय होते.
महत्त्वाच्या बातम्या –
तयारी श्रीलंका दौऱ्याची! फिटनेससाठी हार्दिक पंड्या गाळतोय घाम; शर्टलेस फोटो व्हायरल
साऊदीसमोर रोहित नेहमीच टेकतो गुडघे! कारकीर्दीत तब्बल ‘इतक्या’ वेळा केले आहे बाद
चतुर पंत! भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या टीम साऊदीला असं ओढलं फिरकीच्या जाळ्यात