भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजार आता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहे. त्याने काउंटी चॅम्पियनशिप २०२२ (County Championship 2022) मध्ये ससेक्स संघाकडून पदार्पण केले. पण पदार्पणाचा सामन्यातील पहिल्या डावात तो काही खास कामगिरी करू शकला नाही. पुजारा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून अनेक वर्षांपासून लांब आहे. परंतु, सततच्या खराब प्रदर्शनानंतर आता भारताच्या कसोटी संघातील त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह लावले गेले आहे.
डर्बीशायर विरुद्धच्या सामन्यात ससेक्ससाठी पदार्पण करणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्याच्या पहिल्या सामन्यात अवघ्या ६ धावा करून बाद झाला. सामन्याच्या पहिल्या डावात पुजाराने १५ चेंडू खेळले आणि यामध्ये एकही चौकार न मारता ६ धावा करून बाद झाला. पुजाराच नाही, तर संपूर्ण ससेक्स संघ पहिल्या डावात अपयशी ठरताना दिसला. ससेक्सचा पहिला डाव अवघ्या १७४ धावांवर गुंडाळला गेला.
ससेक्ससाठी पदार्पण करणाऱ्या पुजाराला डर्बीशायरविरुद्धच्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीची संधी मिळाली. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. परंतु, तो काही खास करू शकला नाही. डर्बीशीयरचा मध्यम गती वेगवान गोलंदाज अनुज डलने त्याची विकट घेतली. अनुजने टाकलेल्या डावातील २४ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पुजाराने विकेट गमावली. तो क्षेत्ररक्षक ब्रूक गेस्टच्या हातात झेलबाद झाला.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर डर्बीशरचा कर्णधार बिली गोडलमॅनने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डर्बीशायरने ८ विकेट्सच्या नुकसानावर ५०५ धावा केल्या आणि डाव घोषित केला. यामध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू शान मसूदने द्विशतकी खेळी केली. सलामीसाठी आलेल्या शानने ३४० चेंडूंचा सामना केला आणि २४ चौकारांच्या मदतीने २३९ धावा केल्या.
प्रत्युत्तरत जेव्हा ससेक्स संघचा मैदानात आला तेव्हा त्यांचा पहिला डाव अवघ्या १७४ धावांवर संपला. कर्णधार टॉम हेनिसने सर्वाधिक ४१ धावा केल्या. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद सिजवानने देखील या सामन्यातून ससेक्ससाठी पदार्पण केले. रिजवानने ३२ चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये ३ चौकारांच्या मदतीने २२ धावांचे योगदान दिले. त्याव्यतिरिक्त यष्टीरक्षकाच्या भूमिकेत चार खेळाडूंना झेलबाद देखील केले. पहिल्या डावात ससेक्स ३३१ धावांनी पिछाडीवर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल दिल्ली वि. बेंगलोर सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| मुंबई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!