fbpx
Sunday, February 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

January 21, 2021
in टॉप बातम्या, क्रिकेट, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0

नुकत्याच ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. भारतीय संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या विजयात सर्वच भारतीय खेळाडूंनी पद्धतीने योगदान दिले. मात्र भारतीय संघातील चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे चेंडूवर अंगावर झेलत झुंजार अर्धशतकी खेळी करताना भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार माइकल क्लार्क यांनीही त्याचे कौतुक केले आहे.

ऑस्ट्रेलिया माजी कर्णधार माइकल यांनी चेतेश्वर पुजाराचे कौतुक करताना, त्याची तुलना भारतीय संघाचे माजी खेळाडू राहुल द्रविड यांच्यासोबत केली आहे. त्याचबरोबर ते म्हणाले क्रिकेट विश्वात अजून ही चेतेश्वर पुजारा सारख्या खेळाडूंसाठी एक भूमिका आहे. माइकल क्लार्क म्हणाले, चेतेश्वर पुजारा सारख्या खेळाडूंना बाद करणे अवघड आहे.

माइकल क्लार्क चेतेश्वर पुजाराबद्दल बोलताना म्हणाले, “त्यांच्यामध्ये मला पुन्हा राहुल द्रविड दिसत आहे. का तो नाही आहे? आणि मी नशीबवान होतो की, की मी महान भिंती विरुद्ध खेळू शकलो. पुजाराच्या खेळीत सुद्धा काही भाग समान आहे. ते खूप कठीण आहे, त्याने टीकांचा सामना केला. लोकं म्हणत होते की पॅट कमिन्सकडे त्याला बाद करण्याची तोड होती. मात्र त्याने सर्व काही सहन केले, मात्र आपला खेळ बदलला नाही आणि त्यामुळे तो या श्रेयाचा हक्कदार आहे. ”

माइकल क्लार्कचे पूर्ण वक्तव्य-

माइकल क्लार्क स्पोर्ट्स टुडे सोबत बोलताना म्हणाले, “तो महत्त्वाच्या क्रमांकावर का फलंदाजी करतो? खेळाडू त्याला हलक्यात घेत नाही. ते पुजाराला संघात ठेवण्यासाठी पसंत करतात. क्रिकेटच्या विश्वात सर्व खेळाडू चौकार आणि षटकार ठोकण्यावर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे की, पुजाराचे महत्व काय आहे. पुजारासाठी अजूनही एक भूमिका आहे. त्याने फक्त गाबा येथील सामन्यातच यश मिळवून देणारी भूमिका निभावली नाही, तर त्याने सिडनीतील अवघड परिस्थितीतही भारतीय संघाला सामना अनिर्णीत राखून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. ”

भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराने चौथ्या कसोटी सामन्यात 211 चेंडूचा सामना करताना 7 चौकार ठोकत 56 धावा केल्या होत्या . त्याचबरोबर त्याने भारतीय संघाची एक बाजू लावून धरताना ऑस्ट्रेलिया गोलंदाजांचे चेंडूच्या रूपाने केलेले तीन अंगावर झेलले. त्यापैकी एक चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला. त्याचबरोबर दुसरा चेंडू अंगावर लागून घेतला, तर तिसरा चेंडू मात्र त्याच्या हाताच्या बोटावर लागला. तो चेंडू इतका वेगवान होता की, अक्षरशः त्याच्या बोटातून झणझण्या आल्या. त्यामुळे त्याने बॅट फेकून मैदानावर लोटांगण घातले. मात्र हे सगळे होऊनही त्याने विकेट गमावली नव्हती. मात्र त्यांनंतर 56 धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याला पायचीत केले.

महत्वाच्या बातम्या:

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ


Previous Post

व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजाशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक

Next Post

“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य  

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

February 28, 2021
Photo Courtesy:
Twitter/@BCCI
इंग्लंडचा भारत दौरा

‘विचार करतोय चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल?’ रोहितचा टीकाकारांना टोमणा

February 28, 2021
Screengrab: Twitter/BCCI
इंग्लंडचा भारत दौरा

यंदाच्या वर्षात भारत, इंग्लंडच्या खेळाडूंचा कसोटीत दबदबा, पाहा दोन महिन्यातील संघांची कामगिरी

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
इंग्लंडचा भारत दौरा

“विचार करतोय की, अहमदाबादच्या पीच क्युरेटरला सिडनीमध्ये बोलवावं” ऑस्ट्रेलियन दिग्गजाची मजेशीर प्रतिक्रिया

February 28, 2021
Screengrab: Instagram/MS DHONI FAN PAGE
क्रिकेट

आयपीएल २०२१ पूर्वी धोनीनी दिली ‘या’ मंदिराला भेट, चाहत्यांबरोबर सेल्फीही काढले, पाहा फोटो

February 28, 2021
Next Post

"...म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे", ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य  

आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी श्रीसंत सज्ज; 'हे' तीन संघ लिलावात बोली लावण्याची शक्यता

'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूची विकेट खास, मोहम्मद सिराजने केला खुलासा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.