भारताचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घातल्यानंतर आता तो रॉयल लंडन वनडे कप २०२२ मध्येही आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवताना दिसतोय. नुकतेच रॉयल लंडन वनडे कपमधील ससेक्स संघाचे नेतृत्त्व करताना त्याने धुव्वादार अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या कर्णधार खेळीमुळे ससेक्स संघाला मोठा विजयही मिळाला आहे.
पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडच्या मैदानांवर शानदार प्रदर्शन करतो आहे. रॉयल लंडन वनडे कपमधील (Royal London ODI Cup) ससेक्स (Sussex) विरुद्ध ग्लॉस्टरशायर संघातील सामन्यातही त्याच्या बॅटने आग ओकली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ससेक्स संघ ५० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर ३३४ धावा केल्या. ससेक्सला इतक्या धावा उभारून देण्यात कर्णधार पुजाराचा मोठा हात राहिला.
Cheteshwar Pujara was dimissed stumped out for the first time in his ListA career. 4th time overall in his 548 professional innings.
— Sooraj Ayyappan (@Sooraj_Ayyappan) August 5, 2022
त्याने ७१ चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली. संथ गतीने फलंदाजी करण्यासाछी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराचे हे रूप चाहत्यांसाठी नवे होते. या प्रशंसनीय खेळीवर टॉम स्मिथने पूर्णविराम लावला. टॉम स्मिथच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक जेम्स ब्रेसीच्या हातून पुजारा यष्टीचीत झाला. आपल्या अ दर्जाच्या क्रिकेट कारकिर्दीत पुजाराने यष्टीचीत होण्याची ही पहिलीच वेळ होती.
A first Sharks Royal London Cup half-century for @cheteshwar1. 💫 pic.twitter.com/pPv3ar93eZ
— Sussex Cricket (@SussexCCC) August 5, 2022
ससेक्स संघाकडून पुजाराने केलंय दमदार प्रदर्शन
यापूर्वीही पुजारा ससेक्स संघाकडून खेळला आहे. ससेक्ससाठी काउंटी क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन करताना त्याने १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने ससेक्सकडून काउंटी क्रिकेटमध्ये ८ सामने खेळताना १३ डावांमध्ये १०९.४० च्या सरासरीने १०९४ धावा केल्या आहेत. तो ससेक्सकडून काउंटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ससेक्सने ९ विकेट्स गमावत ३३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ग्लॉस्टरशायरचा संघ २८३ धावांवरच गुंडाळला गेला. यामुळे त्यांनी ५१ धावांनी सामना गमावला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट, रोहितसोबत जे घडतंय, तेच सचिन आणि गांगुलीसोबतही घडून गेलंय; बीसीसीआय अधिकाऱ्याचे भाष्य
दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शेवटचे दोन सामनेही उशिरा सुरू होणार? जाणून घ्या टायमिंग