आजपासून(21 फेब्रुवारी) सुरु झालेल्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत रेल्वेने सौराष्ट्र विरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेला विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात सौराष्ट्रला जरी पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांच्याकडून नाबाद शतकी खेळी करणाऱ्या पुजाराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
पुजाराने सौराष्ट्रकडून सलामीला फलंदाजीला येत 61 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. हे पुजाराचे पहिले टी20 शतक आहे. याचबरोबर अनेक विक्रमही मोडले आहेत.
या सामन्यात सौराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 188 धावा केल्या होत्या. पण त्यांचे हे आव्हान रेल्वेने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 19.4 षटकातच पूर्ण केले.
या सामन्यात पुजाराने केलेले खास विक्रम-
-प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात 350 किंवा त्यापेक्षा अधिक धावा, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि टी20 क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा पुजारा पहिलाच भारतीय खेळाडू.
-टी20 क्रिकेटमध्ये सौराष्ट्राकडून शतकी खेळी करणारा पुजारा पहिलाच फलंदाज.
-प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावा, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि टी20 क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा पुजारा एकुण चौथा भारतीय.
याआधी विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मयंक अगरवाल या भारतीय खेळाडूंनी केला आहे हा पराक्रम. विशेष म्हणजे देशांतर्गत क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारे मयंक आणि पुजारा हे दोनच खेळाडू.
महत्त्वाच्या बातम्या-
–राॅस द बाॅस- राॅस टेलरचा वनडे क्रिकेटमध्ये अजब कारनामा
–स्मिथ- वॉर्नर करणार या मालिकेत आंतरराष्ट्रीय पुनरागमन