जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Sa vs Ind 2nd test) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता, तर दुसरा सामना जिंकून भारतीय संघाला सामना आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. भारतीय कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे (Virat Kohli’s fitness update) संघाबाहेर झाला होता.
विराटऐवजी केएल राहुलला (kl rahul) संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. दरम्यान, आता चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) विराट कोहलीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस (५ जानेवारी) संपल्यानंतर चेतेश्वर पुजाराने म्हटले की, “पाठीच्या दुखण्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकलेला कर्णधार विराट कोहली पूर्वीपेक्षा बरा आहे आणि लवकरच तो पूर्ण तंदुरुस्त होईल.” अशा परिस्थितीत विराट कोहली तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे
विराट कोहली पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता. त्याच्याऐवजी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे. केएल राहुलने नाणेफेकीच्यावेळी म्हटले होते की, विराट कोहली ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्णपणे फिट होईल, तर चेतेश्वर पुजाराचे म्हणणे आहे की, त्याच्या फिटनेसबाबत अधिक माहिती , फिजिओ देऊ शकतात.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला २२९ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने २६६ धावा केल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २४० धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या दिवस (५ जानेवारी ,) अखेर दक्षिण आफ्रिका संघाला २ बाद ११८ धावा करण्यात यश आले आहे. शेवटच्या दोन दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी १२२ धावांची आवश्यकता असणार आहे. तसेच भारताला ८ विकेट्स घेण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या :
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
हे नक्की पाहा :