---Advertisement---

अन् दर्शक झाले अतिआनंदी, जणू पुजाराने शतक केल्यासारख्या वाजवल्या टाळ्या; पाहा नेमकं काय घडलं?

On: सोमवार, ऑगस्ट 16, 2021 11:57 AM
---Advertisement---

लॉर्ड्स| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक घडीवर आहे. पहिल्या डावात उभय संघांनी धुव्वादार फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ मोठ्या आघाडीसाठी चिवट झुंज देताना दिसत आहे. चौथ्या दिवसाखेर (१५ ऑगस्ट) इंग्लंडच्या २७ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ गडी गमावत १८१ धावा फळ्यावर लावल्या आहेत. यासह त्यांनी १५४ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान मैदानावर असा काही किस्सा घडला की, स्टेडियममध्ये उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हसू खुलले.

… अन् मैदानात पिकला हशा
तर झाले असे की, भारतीय संघाने त्यांच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच ५ धावांवर सलामी फलंदाज केएल राहुलची विकेट गमावली. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माही २१ धावांवर झेलबाद झाला. २७ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतर संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर होती. कोहलीने ३१ चेंडूत २० धावा केल्याने तो पुन्हा लयीत आल्याचे दिसले. मात्र सॅम करनने यष्टीरक्षकाच्या हातून त्यालाही पव्हेलियनला पाठवले.

यावेळी दुसऱ्या बाजूला असलेला पुजारा धाव घेण्यासाठी संघर्ष करताना दिसत होता. अखेर कोहली गेल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानावर आला आणि पुजाराने कशीबशी त्याची पहिली धाव काढली. तब्बल ३५ चेंडूंचा सामना केल्यानंतर पुजाराने पहिली धाव घेतल्याचे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित दर्शकांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिली. अनेकांनी उभे राहून त्याच्यासाठी जोराने टाळ्या वाजवल्या. असे वाटत होते, जणू पुजाराने त्याचे शतकच पूर्ण केले आहे.

दर्शकांच्या या कृतीला बघून स्वत: पुजारालाही हसू आले. लॉर्ड्सच्या बालकनीत बसून सामना पाहत असलेले भारतीय खेळाडूही हसू लागले. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.

https://twitter.com/LokeshU64949347/status/1426872625389731843?s=20

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1426870218060558337?s=20

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1426870141871026181?s=20

https://twitter.com/memegineers_/status/1426870365418975235?s=20

पुजारा-रहाणेच्या भागिदारीने सावरला डाव
दरम्यान पुजारा आणि रहाणेच्या जोडीने महत्त्वपूर्ण भागिदारी करत संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवले. पुजारा ४५ धावा करुन मार्क वूडच्या चेंडूवर जो रूटच्या हाती झेल देत बाद झाला. तर रहाणेने ५ चौकारांच्या मदतीने ६१ धावांची झुंजार खेळी खेळत संघाला १६७ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर आता मोठ्या धावसंख्येची जबाबदारी यष्टीरक्षक रिषभ पंतच्या खांद्यावर आहे. तो नाबाद १४ धावांवर मैदानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्याने विराट स्वत:वर नाराज, ड्रेसिंग रूममध्ये ‘अशी’ काढली भडास

संघ कठीण परिस्थितीत असूनही रिषभ दिसत होता निवांत; नेटकरी म्हणाले, ‘हेच त्याच्या यशाचं गुपित’

रोमहर्षक कसोटीत वेस्ट इंडिजची १ विकेटने बाजी, गोलंदाजांच्या अभेद्य भागिदारीने पाकिस्तान चितपट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---