अलीकडच्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कसोटी क्रिकेटमध्ये अधिकाधिक तरुण खेळाडूंना संधी देत आहे. काल रविवारी (08 सप्टेंबर) बीसीसीआयने बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली. ज्यामध्ये अनेक तरुण चेहरे दिसले होते. युवा चेहऱ्यांमध्ये अनकॅप्ड वेगवान गोलंदाज यश दयालच्या नावाचाही समावेश होता. त्यामुळे अशा स्थितीत अनेक दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचे दिसत आहे. दिग्गजांच्या यादीत संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा यांचाही समावेश आहे.
अजिंक्य रहाणे
एकेकाळी अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार होता. पण आता टीम इंडियाचे दरवाजे रहाणेसाठी पूर्णपणे बंद झालेले दिसत आहेत. रहाणेने काही प्रसंगी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्वही केले आहे. रहाणेने शेवटची कसोटी जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. तेव्हापासून रहाणेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
चेतेश्वर पुजारा
भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडनंतर चेतेश्वर पुजाराला ‘द वॉल’ ही पदवी देण्यात आली. पुजाराने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारतासाठी शेवटची कसोटी जून 2023 मध्ये खेळली होती. यानंतर पुजाराकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.
केएस भरत
केएस भरत हा एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा मुख्य बॅकअप यष्टिरक्षक बनला होता. भरतने टीम इंडियासाठी 7 कसोटी सामने खेळले. यापूर्वी भरत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता. मात्र बांग्लादेश मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याची निवड झाली नव्हती. बीसीसीआयने बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलसारख्या युवा यष्टीरक्षकाला संधी दिली.
शार्दुल ठाकूर
शार्दुल ठाकूर हळूहळू टीम इंडियाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक बनू लागला. त्याला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील काही सामने खेळण्याची संधीही मिळाली. यानंतर शार्दुल या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळताना दिसला होता. मात्र त्यानंतर शार्दुलला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले नाही.
हेही वाचा-
एमएस धोनीचा वीस वर्षे जुना विक्रम थोडक्यात हुकला; या खेळाडूने केली बरोबरी
जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला? संघातील हे महत्त्वाचं पद गेलं, बीसीसीआयच्या निर्णयामुळे खळबळ
कुमार संगकाराला मागे टाकत जो रुट सहाव्या स्थानी, सचिन तेंडुलकर किती धावांनी पुढे?