---Advertisement---

‘मैदानावर टिकायचं म्हणून तो चेंडू टोलवताना घाबरत होता’, ऑस्ट्रेलियन दिग्गजांची पुजारावर सडकून टीका

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. भारतीय संघातील खेळाडूंनी खूपच धिम्या गतीने धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी खेळाडू ऐलन बॉर्डर यांनी भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने केलेल्या धिम्या गतीच्या खेळीवर टीका केली आहे.

भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 100.4 षटकांत सर्वबाद 244 धावा केल्या होत्या. यामध्ये चेतेश्वर पुजाराने 176 चेंडूचा सामना करताना 50 धावा केल्या होत्या. यावेळी पुजाराने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात धीम्या गतीचे अर्धशतक करण्याचाही नकोसा विक्रम केला. त्याने 174 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.

त्यामुळे त्याच्यावर रिकी पाँटिंग यांनी सुद्धा टीका केली होती. पाँटिंग यांनी भारतीय संघ पिछाडीवर राहण्यासाठी पुजाराला दोषी मानले होते. मात्र आता ऍलन बॉर्डर यांनी एक पाऊल पुढे जावून पुजारावर टीका केली आहे. बॉर्डर म्हणाले पुजारा शॉट खेळण्यासाठी घाबरत असल्यासारखा वाटत होता. असे वाटत होते की पुजारा धावा काढण्यापेक्षा विकेट वाचवण्याचा जास्त प्रयत्न करत होता.

बॉर्डर फॉक्स स्पोर्ट्स.कॉम.एयू. सोबत बोलताना म्हणाले, “तो (पुजारा) शॉट खेळण्यासाठी पूर्णपणे घाबरत असल्यासारखा वाटत होता, नाही का? तो धावा काढण्यापेक्षा विकेट वाचविण्यासाठी खेळत होता. या मालिकेत त्याचा जास्त प्रभाव दिसून आला नाही. धावा करण्यासाठी त्याने खूप वेळ घेतला. असे वाटत होते की तो खेळपट्टीवर स्थिरावला आहे आणि याचा परिणाम भारतीय फलंदाजीवर झाला. ते ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व मिळवू शकले नाही. “

बॉर्डर म्हणाले,” याचे श्रेय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना द्यायला हवे. त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यांना दबावातून बाहेर पडू दिले नाही. त्यामुळे अर्धी लढाई तर हीच होती. गोलंदाजांना विकेट घेण्यात अडचण येत होती. मात्र जर धावफलकचं स्थिर होता, त्यामुळे हा त्यांचे बक्षीस होते.”

परंतु, पाँटिंग आणि बॉर्डर यांनी जरी पुजाराच्या खेळीवर टीका केली असली तरी ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी असा विचार करत नाहीत.

टॉम मूडी म्हणाले,” पुजारा आपला स्वाभाविक खेळ खेळत होता आणि धावफलक चालता ठेवण्याची जबाबदारी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि विहारीची होती.”

टॉम मूडी ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना म्हणाले, “मला नाही वाटत यामध्ये पुजाराची काही चूक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अशा प्रकारचेच क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे संघाने त्याच्या नैसर्गिक खेळाव्यतिरिक्त वेगळी अपेक्षा करणे योग्य नाही. मी यासाठी रहाणे आणि विहारीला जबाबदार धरेल. विहारीने 38 चेंडूत 4 धावा केल्या. माझ्या हिशोबाने या दोघांनी धावफलक चालता ठेवायला आवश्यक होता. त्यांना पुजाराची या मालिकेत नव्हे तर अन्य मालिकेत सुद्धा भूमिका समजायला पाहिजे की त्याने भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

आपलेच दात, आपलेच ओठ! अश्विनच्या गोलंदाजीवर संघ सहकाऱ्यांनी सोडलेत तब्बल ‘इतके’ झेल

अजबच योगायोग….! मायकल क्लार्कने १६ वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ कामगिरीची मार्नस लॅब्यूशानेकडून पुनरावृत्ती

वर्णद्वेषी टीका! ‘अशा मूर्खपणाची ही पहिलीच वेळ नाही, मलाही असंच..’, हरभजनकडून ‘त्या’ कटू आठवणींचा पुनरूच्चार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---