ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला २-१ ने पराभूत केले होते. या मालिकेत रिषभ पंत, शुबमन गिल, रहाणे यांच्याबरोबर भारतीय संघाची नवी द वॉल चेतेश्वर पुजारा यानेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडसारख्या भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजांचा चेंडू बचावासाठी शरीरावर मारून घेत होता. त्यामुळे त्याला पाहून सर्वांना हाच प्रश्न पडला होता की, ही भिंत तुटत का नाही?.
अशातच ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख गोलंदाज कमिन्स याने पुजाराबद्दल वक्तव्य केले आहे. कमिन्सने पुजाराला ‘विटांची भिंत’ असे म्हटले आहे. याचे कारण असे की, चौथ्या कसोटी सामन्यात पुजारा विकेटच्या बचावात कमिन्सने टाकलेल्या वेगवान चेंडूला आपल्या शरीरावर मारून घेत होता.
चेतेश्वर पुजारा ‘विटांची भिंत’
पुजारा बद्दल बोलताना कमिन्स म्हणाला, “माझ्या नजरेत पुजारा भारतीय संघाची विटांची भिंत होता. विराट कोहली गेल्यानंतर पुजाराची विकेट माझ्यासाठी सर्वात मोठी होती. २ वर्षांआधी त्याने मालिकेत निर्णायक भूमिका बजावली होती. मध्यक्रमात भारतीय संघासाठी तो भिंत होता. मी सुद्धा ती मालिका खेळलो होतो. आता सिडनीमध्ये सामना अनिर्णित राहिला होता. यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती आणि गाबामध्ये विजय मिळविण्यात सुद्धा बरोबरीचा वाटा उचलला होता. या मालिकेत त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.”
बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२०-२१ मध्ये पुजारा विरुद्ध कमिन्स
पुजारा आणि कमिन्स हे दोन्हीही खेळाडू कसोटी क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जातात. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीमध्ये हे दोघेही एकमेकांविरुद्ध खेळत होते. मालिकेतील ८ डावात ५ वेळेस कमिन्सने पुजाराला बाद केले. तसेच पुजाराने कमिन्सविरुद्ध खेळलेल्या ९२८ चेंडूवर २७१ धावा केल्या.
चेतेश्वर पुजाराची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत खेळलेल्या ८२ कसोटी सामन्यांच्या १३८ डावात ४७.७ च्या सरासरीने ६१९९ धावा केल्या आहेत. यात त्याने १८ शतक आणि २९ अर्धशतक झळकावले आहेत. तर त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी २०६ धावा इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशात हिरो अन् मायदेशात झिरो! भारतात रहाणेची फलंदाजी सरासरी चक्क पुजारापेक्षाही कमी
नाम बडे और दर्शन खोटे! ‘या’ तीन खेळाडूंची आयपीएलमधून होऊ शकते सुट्टी
चेपॉकवर ‘हा’ भारतीय संपवणार शतकांचा दुष्काळ?, आणखी दोघांनाही शतक ठोकण्याची संधी