टी२० विश्वचषक २०२१ मध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक दमदार सामना होणार आहे. जेव्हा जेव्हा हे दोन संघ समोरासमोर येतात, तेव्हा तेव्हा केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही दोन्ही देशांचे चाहते मोठ्या उत्साहाने आपआपल्या संघाला पाठिंबा देत असतात.
पाकिस्तानी संघाचा असाच एक समर्थक मोहम्मद बशीर आहे, ज्याला प्रेमाने ‘शिकागो चाचा’ असे म्हटले जाते, हा सामना पाहण्यासाठी तो दुबईलाही पोहोचला आहे. मात्र, तो हृदय आणि डोक्याच्या भांडणात अडकलेला आहे. कारण एकीकडे पाकिस्तानने हा सामना जिंकावा असे त्याच्या हृदयाला वाटते, तर त्याचवेळी त्याचे डोके त्याला भारत हा सामना जिंकेल असे सांगत आहे.
‘शिकागो चाचा’ने एका वृत्तसंस्थेला भारत-पाकिस्तान सामन्याबाबत सांगितले की, भारत-पाकिस्तान हा सामना होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. मी माझ्या मनापासून प्रार्थना करत आहे की पाकिस्तान हा सामना जिंकेल. पण महेंद्रसिंग धोनी माझा आवडता खेळाडू आहे. यावेळी पाकिस्तान जिंकेल. मला अशी आशा आहे की यावेळी पाकिस्तानी जनतेलाही आनंद साजरा करण्याची संधी मिळेल.
‘शिकागो चाचा’ चा एक व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तो पाकिस्तानच्या विजयासाठी जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहे. पण महेंद्रसिंग धोनीवरचे प्रेमही तो लपवू शकलेला नाही आणि पाकिस्तान संघासाठी विजयाच्या घोषणा दिल्यानंतर माझे धोनीवर प्रेम आहे असेही तो म्हणतो.
A message from Pakistan’s biggest cricket fan ChaCha for @msdhoni ahead of the big clash tomorrow!#BharatArmy #TeamIndia #MSD #INDvPAK #India #Pakistan #Cricket #T20WorldCup #COTI ???????? pic.twitter.com/0Utv6pd5IH
— The Bharat Army (@thebharatarmy) October 23, 2021
गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आता भारतीय संघासोबत मार्गदर्शक म्हणून जोडला गेला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये पाकिस्तानला हरवून पहिल्यांदा टी -२० विश्वचषक जिंकला होता. टी -२० विश्वचषकात आत्तापर्यंत दोन्ही देशांदरम्यान ५ सामने झाले आहेत आणि प्रत्येक वेळी भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये ७ सामने झाले आहेत आणि या सामन्यांमध्येही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.
भारतीय संघाने सराव सामन्यांमध्ये दमदार कामगिरी दाखवली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार असल्याचे हे चिन्ह आहे. सराव सामन्यांमध्ये भारताने प्रथम इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाला एकतर्फी पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
शाहिद आफ्रिदीने केले मान्य, भारत-पाक महामुकाबल्यात विराटसेनेचे पारडे राहिल जड
बाबर-रिझवान नाहीतर ‘हा’ पाकिस्तानी फलंदाज ठरू शकतो भारतासाठी सर्वात धोकादायक





