सोमवार, 31 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्ध भारताला नोव्हेंबर महिन्यात तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यानंतर संघ डिसेंबरमध्ये तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेश दौरा करणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला संघातून वगळले गेले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध निवडेलेल्या संघात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नसल्यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. अनेकजणांच्या मते टी-20 विश्वचषक 2022 नंतर बीसीसीआयने कार्तिकसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद केले आहेत. अशातच आता भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) याच्याकडून कार्तिकला संघातून वगळण्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. चेतन शर्मांनी सांगितल्यानुसार कार्तिकचे संघात येण्यासाठीचे दरवाजे नेहमीच खुले आहेत.
माध्यमांशी बोलताना चेतन शर्मा म्हणाले की, आम्ही सध्या वर्कलोड मॅनेज करण्याचे काम करत आहोत. कार्तिकने ज्या पद्धतीने प्रदर्शन केले आहे, त्यामुळे संघ निवडताना नेहमीच त्याचा विचार केला जाईल. आम्ही फक्त वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळाडूंना आजमावण्याचा प्रयत्न करत आहोत. कार्तिकसाठी संघाचे दरवाजे खुलेच आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमद्ये धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या पृथ्वी शॉ यालाही संघात सहभागी केले गेले नाहीये. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शॉ याला संधी मिळणे अपेक्षित होते. शॉविषयी बोलताना चेतन शर्मा म्हणाले की, “आम्ही त्याच्या संपर्कात आहोत. त्याच्यासोबत काहीच चुकीच घडलं नाहीये. त्याला नक्कीच संधी मिळेल. आम्ही त्याच्यासोबत बोलत आहोत आणि त्याला लवकरच संधी दिली जाईल.”
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मिस्टर परफेक्ट’ केन विलियमसनकडून झाली मोठी चूक! व्हिडिओ पाहाच
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास