---Advertisement---

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड बोर्डाचा ‘हा’ मोठा निर्णय

On: गुरूवार, मे 27, 2021 7:12 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. जवळजवळ दीड वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कोरोनाच्या महामारी नंतर आता इंग्लंडमध्ये हळूहळू परिस्थिती सुधारत असून, क्रिकेटसाठी देखील ही आनंदाची बाब आहे. प्रेक्षकांची पुन्हा मैदानावर क्रिकेट बघण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या कसोटी मालिकेतील सामन्यांसाठी काही निवडक संख्येत प्रेक्षकांना परवानगी दिलेली आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 18 हजार प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेलेली आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या कसोटी क्रिकेट बघण्यावर होणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की एजबॅस्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केवळ 16 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. म्हणजेच एक प्रकारे लहान मुलांना मैदानावर प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. अर्थातच हा सर्व निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू न देण्यासाठी घेण्यात आलेला आहे.

एजबॅस्टन क्रिकेट मैदानाच्या प्रशासनाने बुधवारी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, “कसोटी सामन्यासाठी आम्ही दररोज 18 हजार प्रेक्षकांना प्रवेश देवू. तिकिट धारकांना ईमेलद्वारे पुढील माहिती दिली जाईल.” प्रेक्षकांना मैदानावर असताना पाळायचे कोरोना संदर्भातील नियम, यांची देखील माहिती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इंग्लंड व न्यूझीलंड मधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स येथे 2 जून ते 6 जून दरम्यान खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यासाठी प्रेक्षकांची मर्यादा ही एकूण क्षमतेच्या 25 टक्के ठेवण्यात आलेली आहे. इंग्लंडमध्ये बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षक मैदानात उपस्थित राहणार असल्यामुळे एक उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा व भारत-इंग्लंड मधील महत्त्वपूर्ण कसोटी मालिका यापूर्वी ही एक आनंदाची बाब असल्याचे मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पंतचा कमाल स्टंट; WTC फायनल गाजवण्यासाठी रिषभ असा करतोय मेहनत

ना धोनी ना सचिन; वनडेत चक्क पळत १०० धावा करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय

मैदानावर दुखापत झाल्याने ‘या’ तीन खेळाडूंना गमावावे लागले प्राण, एका भारतीयाचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---