---Advertisement---

आनंदाची बातमी!! न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू लाईफ सपोर्टमधून बाहेर, तब्येतीबद्दल मिळाले महत्त्वाचे अपडेट

On: शुक्रवार, ऑगस्ट 20, 2021 8:39 PM
---Advertisement---

न्यूझीलंड संघाचे माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याला गेल्या काही महिन्यांपासून कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. न्यूझीलंड संघासाठी २१५ वनडे सामने खेळलेल्या ख्रिस केर्न्सला हृदय रोगामुळे लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. परंतु आता त्याच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.

ख्रिस केर्न्स यांच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना हृदय रोगामुळे लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. परंतु आता त्यांची प्रकृती बरी होत असल्यामुळे त्यांना लाईफ सपोर्टवरून काढण्यात आले आहे. त्यांचे वकील एरोन लॉयड यांनी म्हटले की,”मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, ख्रिस केर्न्स आता लाईफ सपोर्ट सिस्टिममधून बाहेर आला आहे. आता तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधतोय. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचे आम्ही ऋणी आहोत. आता सर्वांना एकच विनंती आहे की,सर्वांनी गोपनीयता पाळा, जेणेकरून आम्हाला त्याच्या स्वास्थाकडे अधिक लक्ष केंद्रित करता येईल.” ख्रिस केर्न्स गेल्या काही वर्षांपासून कॅनबरामध्ये आपली पत्नी आणि मुलांसोबत राहत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर केर्न्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते. हे आरोप त्याचाच संघ सहकारी लुऊ विसेंटने लावले होते. विसेंटने म्हटले होते की,केर्न्सने त्याला मॅच फिक्सिंग करण्याची ऑफर दिली होती. परंतु केर्न्स वर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले नव्हते. या प्रकरणानंतर केर्न्सला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.त्यावेळी त्याने ट्रक चालवून आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवली होती.(Chris cairns off life support after heart surgery)

केर्न्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
ख्रिस केर्न्सने न्यूझीलंड संघासाठी एकूण ६२ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३३.५ च्या सरसरीने ३३२० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २२ अर्धशतक आणि ५ शतक झळकावले आहे. तसेच २१५ वनडे सामन्यात त्याने २९.५ च्या सरासरीने ४९५० च्या धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

मंधनापाठोपाठ शेफाली वर्मानेही घेतली ‘द हंड्रेड’ लीगमधून माघार, ‘हे’ आहे कारण

नीरज चोप्रासाठी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ गाण्यावर थिरकल्या मुली; तर ‘गोल्डन बॉय’ झाला लाजून चूर

व्हिलचेअर असूनही स्टुअर्ट ब्रॉडच्या चेहऱ्यावरील स्मितहास्याने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---