---Advertisement---

बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत विंडीजची विजयाची हॅट्रिक, नायक पूरन-गेलने केले भन्नाट सेलिब्रेशन

On: मंगळवार, जुलै 13, 2021 12:57 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील तिसरा टी-२० सामना सोमवारी (१२ जुलै) पार पडला. गेल्या २ सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि निकोलस पुरन हे दोघेही पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. परंतु या सामन्यात दोघेही नायक ठरले आहेत. दोघांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिज संघाला विजयाची हॅट्रिक करण्यात यश आले आहे. विजय संपादन केल्यानंतर त्यांनी मनभरुन जल्लोष साजरा केला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाच्या सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मोईसेस हेनरिक्सने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले तर, कर्णधार आरोन फिंचने ३० धावांची खेळी केली. तसेच मॅथ्यु वेडने २३ धावांची खेळी केली होती. इतर कुठल्याही फलंदाजांना मोठी खेळी खेळण्यात यश आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला २० षटकअखेर ६ बाद १४१ धावा करता आल्या. (Chris Gayle and nicholas pooran’s quick knock helps west indies to win against australia in 3rd T20I)

गेल आणि निकोलस पुरनची तुफान फटकेबाजी
ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या १४२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाला साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. परंतु त्यानंतर मैदानात ख्रिस गेल नावाचे वादळ आले होते. गेलने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ३८ चेंडूत ६७ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ७ षटकार लगावले होते. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने हटके स्टाईलमध्ये बॅट दाखवून सेलिब्रेशन देखील केले होते.

ख्रिस गेल बाद झाल्यानंतर, शेवटी निकोलस पुरनने येऊन अवघ्या २७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावले होते. हा सामना वेस्ट इंडिज संघाने ३१ चेंडू आणि ६ गडी शिल्लक असताना आपल्या नावावर केला. त्यामुळे एका अर्थाने सामना खिशात घालणारा पूरन यानेही ओरडत विजयाचा जल्लोष केला.

महत्वाच्या बातम्या-

इतिहासात, आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..

दु:खद बातमी! भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आजच्या दिवशी ४७ वर्षांपूर्वी भारताने खेळला होता पहिला वनडे, ‘असा’ लागला होता निकाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---